Astrology Panchang Yog 23 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 मे चा दिवस म्हणजेच आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, चंद्राने युती ग्रह शुक्राच्या राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी कला आणि मालव्य राजयोगाचा (Yog) शुभ संयोग जुळून आला आहे. त्याचबरोबर आज प्रीती योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगासह उत्तराषाढा नक्षत्राचा देखील शुभ संयोग आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या शुभ राशींच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या कामकाजात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली राहील. मुलांना परदेशात जाण्याच्या संधी निर्माण होतील. त्याचबरोबर, ट्रॅव्हल्स एजन्सी, हॉटेल मॅनेजमेंटशी संबंधित सर्व लोकांना आज चांगला आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुमच्या नशिबाचे दार खुले होतील. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या व्यवसायाचा मोठा विस्तार वाढेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला आज प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे नवीन लोकांबरोबर गाठीभेटी वाढतील. वैवाहिक जीवन सुखी राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुम्हाला नशिबाचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ देखील तुम्हाला लवकरच मिळेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. तसचे, लवकरच तुमच्या हातात मोठं प्रोजेक्ट येणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्नशील राहा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. त्यामुळे तुमच्या मार्गात येणारे अडथळे आज दूर होतील. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज बॅंकिंग, फायनान्स तसेच, कम्युनिकेशनशी संबंधित लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. लवकरच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ तुम्ही घ्याल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :