Weekly Horoscope 26 May To 1 June 2025 : मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जून महिना लवकरच सुरु होणार आहे. ग्रहांच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्त्वाचा आहे. कारण या दरम्यान शनी जयंती आहे. तसेच, मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी नवीन आठवडा काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या काळात मित्रांच्या सहकार्याने तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी खर्च वाढू शकतात. या काळात नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. तसेच, कुटुंबियांबरोबर थोडा वेळ घालवा.  

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. या दरम्यान तुम्ही अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यास सक्षम असाल. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा तुमच्यासाठी चांगला काळ आहे. धार्मिक यात्रेत सहभागी व्हा.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा फार शुभकारर असणरा आहे. यया काळात अध्यात्मात तुमची आवड निर्माण होईल. तुमच्या वाणीत मधुरता राहील. तसेच, जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर हा आठवडा तुमच्यासाठी फार योग्य ठरणार आहे. भविष्यात चांगला लाभ मिळेल.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा फार खास असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या मित्राबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता निर्माण होईल. स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखू नका. आरोग्याची काळजी घ्या.  

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा फार सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला ना फायदा ना तोटा होणार आहे. मात्र, तरीही तुम्ही फार खुश असाल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. आठवड्याच्या शेवटी उत्पन्नाच्या संधी वाढू शकतात. त्यामुळे निराश होऊ नका.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. तुम्हाला जर एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर त्यासाठी नवीन आठवडा महत्त्वाचा आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत वाढ झालेली दिसेल. तसेच, देवी लक्ष्मीचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक