पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death) फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक (Rajendra Hagawane and Sushil Hagawane arrested) करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज शुक्रवारी (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. फरार असतानाच हे बाप लेक हॉटेलमध्ये कोणालातरी भेटल्याचं आणि एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना दिसत आहेत, त्यानंतर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.यावरती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त करत वैष्णवीच्या  दिर आणि सासरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले की आरोपी स्वतः हून हजर झाले अजून स्पष्ट झाले नाही, असंही म्हटलं आहे. 

Continues below advertisement


तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे


सुषमा अंधारे यांनी सोशल मिडियावरती याबाबत पोस्ट लिहून संताप व्यक्त करत यामध्ये आरोपींना राजकीय पाठबळ मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सुषमा अंधारेंनी पोस्टमध्ये लिहलंय, "वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणांमध्ये पहाटे साडेचार वाजता दिर आणि सासरा यांना अटक झाली. मात्र, पोलिसांनी ताब्यात घेतले की आरोपी स्वतः हून हजर झाले अजून स्पष्ट झाले नाही. जर आरोपी स्वतःहून हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे हे गोष्ट अधिकच जात अधोरेखीत होते. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असं जेव्हा आत्ता सहा दिवसापासून रुसून बसलेला महिला आयोग सांगत असेल तर वैष्णवीचा जीव गेल्यापासून पाच दिवस होऊन गेल्यानंतरही सरकार ॲक्शन मोडमध्ये का आले नाही? वैष्णवी प्रकरणात आरोपींना अटक होत असतानाच नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या चाचला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणात सरकार आणि सुस्तावलेला आयोग ॲक्शन मोडमध्ये कधी येणार आहे?", असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.



तर एबीपी माझाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून माध्यमं, सामाजिक कार्यकर्ते विरोधक या सर्वांनी मिळून याबाबत आवाज उठवला त्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले.  त्यानंतर आज कारवाई झालेली आहे. इतक्या उशीरा पोलिसांना आणि सरकारला जाग येते आणि त्यानंतर ते अॅक्शन मोडमध्ये येतात ते मयुरी हगवणेंनी तक्रार दिल्यानंतर तेव्हाच अॅक्शन मोडमध्ये आले असते, तर आज वैष्णवी आपल्यासोबत असती. हुंडाबळीचे जेव्हा असे प्रकार घडतात तेव्हा  पोलिस यत्रंणा नेमक्या करतात काय? कारण वैष्णवीची घटना ताजी असतानाच परवा एक घटना समोर आली आहे.नाशिकमध्ये येवला येथे भक्ती अथर्व गुजराती या तरूणीने सासरच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं. त्यामुळे पोलिस ज्या प्रकार हंगामी पध्दतीने अॅक्शन मोडमध्ये येतात, त्या हंगामी पध्दतीवर माझा अक्षेप आहे, असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 


लता हगवणे यांचा सख्खा भाऊ हे विशेष पोलिस निरीक्षक कारागृहाचे अधिकारी म्हणून काम करत आहेत. घरातील व्यक्ती पोलिस प्रशासनाच्या इतक्या मोठ्या पदावरती असेल तर स्वाभाविक आहे या लोकांना आधार मिळणे स्वाभानिक आहे. राजेंद्र हगवणेंचे अगदी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्यापासून ते आदिती तटकरे यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामध्ये एक कौंटुबिक वावर दिसतोय त्यातून राजकीय पाठबळामुळेच त्यांची मुजोरी इतकी वाढते आहे असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 


सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.