Weekly Horoscope 24 June To 30 June 2024 : जून महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र तूळ राशीत असणार आहे .तसेच,आठवड्याचा मधला आणि शेवटचा दिवस खूप खास असणार आहे. एकूणच मेष ते मीन राशीच्या (Zodiac Signs) लोकांचा आठवडा नेमका कसा असेल जाणून घेऊयात साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope).  


मेष रास साप्ताहिक राशीभविष्य 


नवीन आठवड्यात तुमची तब्येत सर्वसामान्य असणार आहे. फक्त या आठवड्यात तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण महिना संपत येतोय त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. मित्राच्या सहकार्याने तुमची अनेक कार्य पूर्ण होतील. तसेच, या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. तसेच, व्यावसायिक लोकांसाठी देखील हा काळ चांगला आहे. फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. 


वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य 


वृषभ राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी हा काळ उत्तम आहे. या काळात तुम्ही कोणताही निर्णघ घेताना काळजीपूर्वक घ्या. या दिवसांत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला धनलाभाच्याही संधी मिळतील. तुमचे विरोधी या काळात तुम्हाला त्रास देणार नाहीत. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. 


मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य 


या काळात तुमच्या मनात अनेक विचारांची उलथा-पालथ सुरु असेल. तसेच, धार्मिक गोष्टींवर तुमचे पैसे खर्च होतील. पण, याचा लाभ देखील तुम्हाला नंतर मिळेल. तुमच्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. 


कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य 


कर्क राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवा. या कालावधीत तुमचे खर्च नकळतपणे वाढतील. त्यामुळे वेळीच खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन फारच सुखी आणि आनंदी असेल. 


सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य 


सिंह राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात उत्पन्नाच्या अनेक संधी मिळू शकतात. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयाला प्राधान्य दिले जाईल. तसेच, तुम्ही जर वाहन चालवत असाल तर वाहन चालवताना काळजी घ्या. या काळात तुमचा धार्मिक गोष्टींकडे कल वाढताना दिसेल. 


कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य 


कन्या राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. तुम्ही आखलेल्या योजनांचा विचार केला जाईल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जे विचार सुरु होते त्यांना आता पूर्णविराम बसलेला दिसेल. कारण, नवीन आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Dev : 30 जूनला होणार शनीची वक्री! पुढचे 139 दिवस 'या' राशींवर होणार सुखाची बरसात, जगतील राजासारखं आयुष्य