Shani Dev : ज्योतिष शास्त्रात शनीला (Shani Dev) न्यायदेवता, कर्मफळदाता अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. सध्या शनी (Lord Shani) आपल्या मूळ राशीत म्हणजेच कुंभ राशीत (Aquarius Horoscope) विराजमान आहे. लवकरच शनीची वक्री म्हणजेच उलटी चाल सुरु होणार आहे. साधारण 30 जून ते 15 नोव्हेंबरपर्यंत शनी कुंभ राशीतच वक्री होणार आहे. अशा प्रकारे तब्बल 139 दिवस शनी उलटी चाल चालणार आहे. असं म्हणतात की, कोणत्याही ग्रहाची जेव्हा उलटी चाल सुरु होते तेव्हा त्याचा राशींवर अशुभ परिणाम होतो. पण, शनीच्या उलट्या चालीचा काही राशींवर शुभ परिणाम होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


शनीच्या वक्री चालीने मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. शनीच्या कृपेने तुमच्या पैशांसंबंधित सर्व अडचणी हळूहळू दूर होतील. त्याचबरोबर शनीच्या उलट्या चालीमुळे तुम्हाला तुमचे खरे मित्र देखील कळतील. या दरम्यान, तुमच्या यश किंवा किर्तीमध्ये देखील वाढ होईल. फक्त वाईट कामांपासून दूर राहा. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


शनीच्या उलट्या चालीने धनु राशीच्या जीवनात सकारात्मक घडण्याची शक्यता आहे. जे नोकरदार वर्गातील लोक आहेत त्यांचं वर्चस्व कामाच्या ठिकाणी वाढताना दिसेल. या दरम्यान तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम असण्याची गरज आहे. याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. प्रेमसंबंधांसाठी देखील हा काळ चांगला आहे. तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. तसेच, कुटुंबियांबरोबर देखील चांगला वेळ जाईल. 


मकर रास (Capricorn Horoscope) 


शनीच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तुम्हाला कोणत्याही मार्गाने धनलाभ होऊ शकतो. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. या काळात तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याचा थेट परिणाम तुमच्या कुटुंबियांवर होणार आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


शनी आपल्या स्वत:च्याच राशीत वक्री होणार आहे. त्यामुळे याचा लाभ कुंभ राशीच्या लोकांना नक्की होणार आहे. या काळात अनेक दिवसांपासून तुमची काही कारणास्तव थांबलेली कामे पूर्ण होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या कार्याची वाट पाहात होतात त्यावर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. शनीच्या कृपने तुमच्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. अर्थात मेहनत करावी लागणार आहे कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Saturday Remedies : शनि दोष दूर करण्यासाठी आज शनिवारच्या दिवशी करा 'हे' उपाय; सर्व संकटं होतील दूर, जीवनाची गाडी येईल रुळावर