Weekly Horoscope 22-28 April 2024 : एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि कर्कसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. एप्रिलचा नवीन आठवडा (22 April To 28 April Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्ही इतरांना त्यांचं काम पूर्ण करण्यास मदत करू शकतात. कोणताही मोठा निर्णय घेताना सर्वांचं सहकार्य मिळेल. जर तुम्ही परदेशात काही कामात गुंतले असाल तर तुमचं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला फायदाही होईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रपोज केलं तर तुम्हाला होकार मिळू शकतो.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही मोठी कामं सहज पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या आठवड्यात तुमचा खर्च आवश्यकतेपेक्षा जास्त वाढू शकतो. कुटुंबीयांसोबत काही वाद सुरू असतील तर तो मिटवण्याचा प्रयत्न करा.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा थोडा व्यस्त असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा किंवा चांगला पर्याय शोधत असाल तर तुमचा शोध संपेल, तुम्हाला हवी ती नोकरी मिळेल. कोर्टात होणारे निर्णय तुमच्या बाजूने लागतील.


कर्क रास (Cancer)


नवीन आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. जर तुम्ही आधीच कोणत्याही योजनेत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यातून नफा मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले व्यवहार पूर्ण होतील. तुम्हाला परदेशात करिअर करायचं असेल तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. नोकरदार महिलांसाठी हा काळ चांगला राहील, उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होतील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप भाग्याचा असेल. या आठवड्यात तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. इच्छित पदोन्नती किंवा बदली होऊ शकते. करिअर आणि व्यवसायासाठी हा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्या सर्व कामात तुमचे मित्र आणि नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची कोणतीही मोठी समस्या मित्रांच्या मदतीने सोडवली जाईल. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला लोकांचं सहकार्य मिळेल. घर आणि ऑफिसमध्ये तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. या आठवड्यात तुमचा कल प्रेमाकडे, प्रियकराकडे अधिक वाढू शकतो.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार फलदायी; अचानक धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवीन पर्याय उपलब्ध होणार