Weekly Lucky Zodiacs 22 To 28 April 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 22 एप्रिलपासून नवीन आठवडा सुरू होणार आहे. 23 एप्रिलला हनुमान जयंती येत असल्यामुळे हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


22 एप्रिलपासून सुरू होणारा आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी खूप लाभदायी ठरणार आहे. या आठवड्यात हनुमानजींची विशेष कृपा तुमच्यावर असेल. करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहील. नवीन व्यवसायातही तुम्हाला यश मिळू शकतं.


मिथुन रास (Gemini)


बजरंगबलीच्या कृपेने तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नफा मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. नवीन आठवड्यात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन आठवड्यात तुमच्या जीवनात आनंद येईल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा चांगला जाईल. व्यवसायिकांचे त्यांच्या भागीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. या आठवड्यात कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकतं. या आठवड्यात तुम्हाला प्रवासाचा आनंद मिळू शकतो, तुम्ही मित्रमंडळींसोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता.


कन्या रास (Virgo)


नवीन आठवड्यात कन्या राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये मोठा निर्णय घेतील, ज्याचा त्यांना फायदा होईल. नोकरीत तुमची प्रगती होईल. हनुमानजींच्या कृपेने तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमच्या चांगल्या वागणुकीमुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. सामाजिक जीवनात मान-सन्मान वाढेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.


धनु रास (Sagittarius)


नवीन आठवड्यात धनु राशीचे लोक कामावर उत्तम कामगिरी करतील, तुमचा बॉस तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे प्रभावित होईल. तुम्हाला कुठूनतरी नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. काही लोक परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही व्यायाम आणि योग केल्यास तुम्हाला अधिक चांगलं आरोग्य लाभेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 22 to 28 April : मेष ते मीन, 12 राशींसाठी पुढचा आठवडा खास; जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक