Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. ऑगस्ट महिन्यातला चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Weekly Horoscope)


तूळ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात सावधान राहण्याची गरज आहे. नवीन आठवड्यात तुम्ही जे तुमचं काम बिघडवतात त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तसेच, जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर त्यात तुम्हाला उतार-चढाव पाहायला मिळू शकतात. 


वृश्चिक रास  (Scorpio Weekly Horoscope)


नवीन आठवडा तुमच्यासाठी फार लकी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लोकांचा सहभाग मिळेल. बिझनेसच्या माध्यमातून तुम्हाला प्रवासाचा योग येऊ शकतो. कामाच्या निमित्ताने तुमची ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे.


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन आठवड्यात तुम्ही आळसचा त्याग करणं गरजेचं आहे.वाहन चालवताना काळजी घ्या. तसेच, नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर नवीन व्यवसाय सुरु करु शकता. 


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र जाईल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपावल्या जाऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक होऊ नये. राग बाजूला ठेवून कोणतंही काम करा. या आठवड्यात प्रियकरासोबत मतभेद होऊ शकतात.


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु ही संधी तुमच्या हातून निसटू देऊ नका, जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकतं. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या