Weekly Horoscope 19 To 25 August 2024 : ऑगस्ट महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. श्रावण (Shravan) महिना देखील सुरु आहे त्यामुळे अनेक राशींसाठी हा महिना खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. वृषभ आणि मेषसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. तर, मिथुन राशीला आर्थिक चणचण भासेल. एकूणच ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope)


नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असणार आहे. नवीन आठवड्यात मेष राशीचे लोक आपलं ध्येय पूर्ण करण्याच्या मार्गावर असतील. थोडेसे उतार-चढाव असतील. प्रत्येक कामात तुम्हाला धावपळ करावी लागू शकते. जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतायत त्यांना अधिक मोहनत करण्याची गरज आहे. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. बौद्धिक क्षमतेचा विकास झालेला दिसेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी जोडीदाराची चांगली साथ तुम्हाला लाभेल. या आठवड्यात तुम्ही तुमची कामं अगदी वेगाने पूर्ण कराल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा व्यवसाय अधिक वृद्धिंगत होऊ शकतो. लव्ह लाईफ तुमची चांगली असेल. वैवाहिक जीवन सुखी असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमच्यावर अचानक कामाचा ताण येण्याची शक्यता आहे. तसेच, प्रॉपर्टीशी संबंधित तुमचे वाद लवकरच मिटू शकतात. तुमचे खर्च वाढत राहतील. तसेच, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुमचा व्यापार देखील चांगला चालेल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याचा नवीन आठवडा चांगला जाणार आहे. जर तुम्हाला शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. शैक्षणिक बाबतीत तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा खर्चिक असणार आहे. छोट्या-मोठ्या गोष्टींवर तुमचे जास्त पैसे खर्च होतील. मात्र, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे एक प्रकारे सकारात्मक दृष्टीकोन राहील.या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत सतर्क असणं फार गरजेचं आहे. 


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही नवनवीन प्रयोग करून स्वत:ला पडताळू शकता. अनेक नवीन धोरणं स्विकारण्यासाछी तयार राहा. तसेच, पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :