Weekly Horoscope 17 To 23 March 2025 : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. मार्च महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर रोमॅंटिक वेळ घालवू शकला. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरु करु शकता.
करिअर (Career) - तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुम्हाला नोकरी मिळेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबातही तुम्हाला चांगला मान मिळेल. तसेच, तुमच्या नवीन कल्पन्नांचा कस लागेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्ही लॉंग टर्म प्लॅनिंग डोक्यात ठेवून गुंतवणूक करु शकता. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम होण्याची गरज आहे.
आरोग्य (Health) - या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर भर देणं गरजेचं आहे. यासाठी हेल्दी जीवनशैली फॉलो करा. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या.
वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुम्हाला तुमचं प्रेम मिळवण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागेल. या काळात तुमच्या वादविवाद देखील होतील. अशा वेळी मनाचा मोठेपणा दाखवणं गरजेचं आहे.
करिअर (Career) - या आठवड्यात तुमच्या करिअरची उंची तुम्ही गाठाल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. मात्र, यशाने भारावून न जाता. जमिनीवर राहून मेहनत घेणं जास्त फायद्याचं ठरेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला पैशांचा जपून वापर करावा लागेल. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तुमचा व्यवसाय देखील चांगला चालेल.
आरोग्य (Health) - या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्यावं लागेल. ज्या गोष्टी तुमच्या शरीराला सूट होत नाहीत त्या गोष्टींपासून दूर राहा. तसेच, योग आणि ध्यान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: