Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. 2024 वर्षातील शेवटचा महिना असल्या कारणाने हा महिना फार खास असणार आहे. तसेच, या आठवड्यात मार्गशीर्ष महिना देखील सुरु होतोय. त्यामुळे एक प्रकारे धार्मिक महत्त्व आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबरचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Weekly Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या राशीचे लोक नवीन आठवड्यात सामाजिक कार्यात व्यस्त असतील. तसेच, तुमच्या नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. आर्थिक बाबतीत पैसे खर्च करताना सावधानता बाळगा. तसेच, पैशांचा अतिवापर देखील करु नका. नवीन आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सतर्क राहावं लागेल. तसेच, या काळात तुम्ही योग, ध्यान, व्यायामाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. 


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्हाला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. बॉसकडून तुमच्यावर नवीन जबाबादाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या काळात तुमच्यासमोर प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. धार्मिक यात्रेला जाण्याचा शुभ योग आहे. मात्र, आठवड्याच्या मध्यात तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. अशा वेळी तुमचे खर्च जपून करा. कुटुंबियांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. 


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामातून चांगला लाभ मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुर्लक्ष केल्यास साथीचे आजार उद्भवू शकतात. 


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सर्वसामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं. तसेच, तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला मित्रांचा चांगला सपोर्ट मिळेल. आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तसेच, सकस आहार घ्या. 


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास अधिक पटीने वाढेल. कामात तुमचं मन रमेल. अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्यांचा तुम्ही पुरेपूर वापर करा. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. या काळात अनावश्यक खर्च करु नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 16 To 22 December 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक