Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा लाभदायी असेल. ऑक्टोबर महिन्याचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना करू शकता. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रियकराकडून काही चांगली बातमी मिळू शकते. मुलांशी संबंधित कोणताही मोठा तणाव दूर होईल, ज्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात आराम मिळेल.


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


आठवड्याच्या सुरुवातीला वृषभ राशीच्या लोकांसोबत काही वाईट घडू शकतं, त्यामुळे काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचा दिखाऊपणा करू नका. व्यावसायिकांना अपेक्षित यश मिळेल. प्रियकरासोबत वीकेंडचा आनंद घ्याल. तुम्ही कुटुंबासोबत धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता.


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांना काहीतरी तडजोड करावी लागेल. ऑफिसमधील टीमचा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मालमत्तेच्या वादात लोक तुमची मदत घेऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीमुळे चिंतेत असाल.


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांचे करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल आणि आणखी नवीन संधीही मिळू शकतात. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत छान क्षण घालवू शकाल. तुमचं आरोग्य सामान्य राहील.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी नीटपणे वागाल, नवीन आठवड्यात तुमच्या व्यवसायात वाढ होईल. प्रियकरासोबत प्रेमसंबंध मजबूत होतील. परंतु या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या, जुने आजार परत येऊ शकतात.


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधांची चांगली काळजी घ्या. कुटुंबात काही कारणावरून वाद होऊ शकतात. जोडीदाराला तुम्ही एका आलिशान स्पा रिसॉर्टमध्ये घेऊन जाऊ शकता, यामुळे तुमचं नातं आणखी घट्ट होऊ शकतं. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि तुमचा तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य