Weekly Horoscope 10 June To 16 June : जून महिन्याचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मेष आणि कर्कसह इतर राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअरबाबत विशेष लाभ मिळेल. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष रास (Aries Weekly Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी जूनचा दुसरा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला काही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या काळात घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या. भागीदारी व्यवसायात जोडीदारावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी चांगला नाही. प्रेमात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याबाबत सतर्क राहा.


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


जूनचा दुसरा आठवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी तेथील लोक तुम्हाला साथ देण्यासाठी पुढे येतील. न्यायालयीन प्रकरणं निकाली काढता येतील. या आठवड्यात तुम्ही प्रवासाची योजना आखू शकता. तुम्हाला खूप दिवसांपासून प्रॉपर्टी खरेदी करायची इच्छा असेल तर तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. या काळात तुमचे प्रेमसंबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी जूनचा दुसरा आठवडा सावधगिरी बाळगण्याचा असेल. या आठवड्यात तुमच्यावर कामाचा ताण जास्त असेल. लोक तुमच्या कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न शकतात. जर तुम्हाला परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर या आठवड्यात तुम्हाला त्याच्याशी संबंधित चांगल्या बातम्या मिळू शकतात. परोपकार आणि धार्मिक कार्यात तुमचं मन वाहून घ्याल तर तुम्हाला फायदा होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र राहील. या आठवड्यात तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. तुमच्या कामात विनाकारण अडथळे येऊ शकतात, त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ शकतं. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करू शकता आणि तुम्हाला त्यात नफाही मिळेल. जोडीदारासोबत नात्यात काही अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या दोघांमधील तणाव वाढू शकतो. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीबद्दल तुम्ही चिंतेत असाल.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाईल. तुमची नियोजित कामं या काळात पूर्ण होतील. तुम्ही नव्या उमेदीने पुढे जाल आणि तुमचं काम पूर्ण कराल. तुमची प्रमोशन आणि ट्रान्सफरची प्रतीक्षा संपेल. जर तुम्ही घाऊक व्यवसायात असाल तर तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे घर आणि कामामध्ये संतुलन राखणं कठीण होऊ शकतं. प्रेमसंबंधात मधुरता येईल.


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. तुमची सर्व नियोजित कामं पूर्ण होतील. अडचणींचा काळ संपेल. पण नेहमी सतर्क राहा, कामात ढिलाई करू नका. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 10 June To 16 June 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक