Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने एक राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करणार आहे. जूनचा (June) महिना सुरु झाला आहे. अशातच 12 जूनला शुक्र ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रहाला सुख-समृद्धीचा कारक मानले जाते. तर, शुक्र ग्रहाला देवी लक्ष्मीचा कारक मानले जाते.
असं म्हणतात की, ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत आहे. त्यांना त्यांच्या जीवनात यश मिळतं. तसेच, तुमच्या मान-सन्मानात वाढ होते. तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळते. तसेच, व्यक्तीच्या जीवनात सुख-शांती आणि ऐश्वर्यात वाढ होते. त्यामुळे 12 जूनला शुक्राच्या राशीपरिवर्तनाचा कोणत्या राशींचं (Zodiac Sign) भाग्य उजळणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी जून महिना अनेक अर्थांनी खास असणार आहे. या दरम्यान मेष राशीच्या लोकांच्या साहस, धैर्य आणि वृद्धीतही वाढ होईल. तुमही करत असलेल्या व्यवहारात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तुमच्या आयुष्यात अनेक शुभ योग जुळून येतील.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं परिवर्तन हे फार शुभ ठरणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या भौतिक सुखात चांगली वाढ होईल. या काळात जर तुम्हाला नवीन घर, वाहन किंवा एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभ आहे. तसेच, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हलाा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अनेक दिवसांपासून सुरु असलेली पैशांची अडचण दूर होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच शुभकारक असणार आहे. जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळेल. जोडीदारांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं संक्रमण फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी अनेक आव्हानं येतील पण काळानुसार सर्व गोष्टी ठीक होतील. तुमच्या तब्येतीत चांगली सुधारणा दिसून येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: