Weekly Horoscope 10 June To 16 June : जूनचा दुसरा आठवडा (June) लवकरच सुरू होणार आहे. जूनचा नवीन आठवडा 10 जूनपासून सुरू होणार असून 16 जूनपर्यंत चालणार आहे. नवीन आठवड्यात काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, येत्या दिवसांत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नवीन आठवड्यात नवीन कामं उकरुन काढू नका, अन्यथा तुमची काम खोळंबली जाऊ शकतात. नवीन आठवड्यात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नेमक्या कोणत्या राशींना नवीन आठवड्यात (Weekly Horoscope) काळजी घ्यावी लागणार? जाणून घेऊया


कन्या रास (Virgo)


नवीन आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी कठीण जाईल. या आठवड्यात तुमचं काही महत्त्वाचं काम असेल तर ते पुढे ढकलण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात तुमचे खर्च वाढू शकतात आणि प्रियजनांशी तुमचे वाद होऊ शकतात. तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा त्रासदायक ठरू शकतो. या आठवड्यात तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार नाही. हा आठवडा तुमच्यासाठी व्यस्त असेल, तुमचं एखादं काम अडकू शकतं, हा येता संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी व्यस्त असेल. या काळात तुमचं नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या आठवड्यात तुमचे विरोधक तुमच्या विरोधात उभे राहू शकतात, त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. नवीन आठवड्यात तुमच्या समोरच्या समस्या वाढतील. अचानक तुम्हाला काही कामाचा ताण जाणवू शकतो. या काळात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.


कुंभ रास (Aquarius)


नवीन आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. च्याकुंभ राशीच्या लोकांना पैशा बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात आरोग्याची काळजी घ्या. या आठवड्यात तुम्ही आयुष्यातील मोठे निर्णय घेऊ शकता. तुमचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या, कोणत्याही कामात निष्काळजी राहू नका.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 10 June To 16 June 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी पुढचा आठवडा कसा? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक