Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : नोव्हेंबर महिना संपून डिसेंबरचा महिना सुरु व्हायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. 2024 वर्षातील शेवटचा महिना असल्या कारणाने हा महिना फार खास असणार आहे. तसेच, या आठवड्यात मार्गशीर्ष महिना देखील सुरु होतोय. त्यामुळे एक प्रकाने धार्मिक महत्त्व आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. डिसेंबरचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Weekly Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्यावर कामाची जबाबदारी असेल. तुम्ही प्रामाणिकपणे या जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील वातावरण प्रसन्न पाहायला मिळेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांपासून सावध असण्याची गरज आहे. पैशांच्या बाबतीत तुम्ही पैसे जपून वापरणं गरजेचं आहे. तसेच, घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. 


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा नवीन आठवडा मिश्रित स्वरुपाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही कोणाच्याच बोलण्यात येऊ नका. कोणीही तुमचा विश्वासघात करु शकतं. तसेच, या आठवड्यात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही अधिक सतर्क असण्याची गरज आहे.


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी धावपळ करावी लागेल. या काळात डोक्यावर अतिरिक्त कामाचा भार असेल, ज्यामुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक थकवा देखील येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा नोकरीत बदलाची अपेक्षा करणाऱ्या लोकांना अजून थोडी वाट पहावी लागेल. आठवड्याच्या शेवटी तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा स्थितीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी लोकांच्या छोट्या गोष्टींना महत्त्व न देता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. 


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ आणि फलदायी ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर ते वरिष्ठ  व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील. व्यापारी लोकांचे पैसे बाजारातून अनपेक्षितपणे बाहेर येतील. या काळात तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील. तुमच्या लव्ह लाईफशी संबंधित समस्या दूर होतील, तुमचं कुटुंब तुमचं नातं स्वीकारू शकेल आणि तुमच्या लग्नाचा विचार करू शकेल. 


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


या आठवड्यात कोणतंही काम घाईने करणं टाळावं लागेल. कामाच्या ठिकाणी कोणतंही काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतः करणं चांगलं. या आठवड्यात तुमच्यावर दुसऱ्याकडून चुकीचा आरोपही होऊ शकतो, अशा परिस्थितीत अत्यंत सावधगिरीने आणि हुशारीने वागा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात वाहन जपून चालवा. व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरीने करा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. 


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. जे लोक बऱ्याच दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आठवड्याचे मधले दिवस खूप शुभ राहतील. या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. आठवड्याच्या शेवटी घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 02 To 08 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य