(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virgo Horoscope Today 17 June 2023 : नोकरीत प्रगतीची संधी मिळणार; कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्साही
Virgo Horoscope Today 17 June 2023 : कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
Virgo Horoscope Today 17 June 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय (Business) करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. प्रवासाला जाण्याचीही संधी मिळेल. हा प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. नवीन लोकांशी संबंध निर्माण होतील. नोकरदार (Employees) लोकांना उच्च अधिकार्यांकडून नोकरीत (Job) बढतीची संधी मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. आज तुम्हाला आर्थिक लाभ संभवतो. नोकरदार लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराकडून (Life Partner) चांगली बातमी ऐकायला मिळेल. मित्रांच्या (Friends) मदतीने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
नोकरीत प्रगती दिसेल
तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती दिसेल. यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. शारीरिक व्यायाम केल्याने तुमच्या प्रकृतीतही सुधारणा जाणवू लागेल. संध्याकाळी घरी पाहुणे येण्याचा योग आहे. व्यवसायात पर्यायी मार्ग मिळाल्यामुळे गुंतवणूक करता येईल. ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराविषयी कोणतीही शंका मनात ठेवू नका.
कन्या राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ नये. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज व्यावसायिकांना ग्राहक किंवा व्यापारी लोकांना पैशांचे व्यवहार करण्यात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आरोग्याबाबत जागरुक राहा.
आजचे कन्या राशीचे आरोग्य
कन्या राशीच्या लोकांना आज छातीत दुखण्याची समस्या भासू शकते. हृदयरोगींनी कोणत्याही प्रकारच्या औषधांबाबत निष्काळजीपणा करु नये. औषध आणि आहाराच्या बाबतीत गाफील राहू नका
कन्या राशीसाठी आजचे उपाय
उद्या उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करा आणि त्या पाण्यात लाल चंदन टाकून सूर्याला अर्पण करा.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :