Vijaya Ekadashi 2024 : पंचांगानुसार, माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला (Ekadashi) विजया एकादशीचं व्रत ठेवलं जातं. यंदा विजया एकादशी 6 मार्च रोजी आली आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, असं म्हटलं जातं. एकादशीच्या दिवशी पूजेच तुळशीच्या पानांचा वापर करणं फार शुभ समजलं जातं. परंतु, या दिवशी तुळशीशी संबंधित काही चुका टाळल्या पाहिजे.


जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. या एकादशीशी संबंधित काही विशेष नियम आहेत. जया एकादशीच्या दिवशी चुकूनही काही कामं करू नये, अन्यथा व्रताचं शुभ फळ मिळत नाही, अशी मान्यता आहे. जया एकादशीला तुळशीशी संबंधित देखील असेच नियम आहेत, जाणून घेऊया.


एकादशीला तुळशीशी संबंधित 'या' चुका आवर्जून टाळा


ज्योतिषशास्त्रात तुळशीच्या रोपाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तुळशीची नित्यनियमाने पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होतं. दररोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. मात्र, एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये.


पौराणिक कथांनुसार, एकादशीच्या दिवशी तुळशी माताही भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये, अन्यथा तुळशी मातेचं व्रत तुटू शकतं.


तुळशी माता ही भगवान विष्णूला प्रिय आहे, त्यामुळे एकादशीच्या पूजेत तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. परंतु, एकादशीच्या एक दिवस आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावी. एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडणंही टाळावं.'


विजया एकादशी मुहूर्त (Vijaya Ekadashi Muhurta)


पंचांगानुसार, विजया एकादशी 6 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 4 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 6 मार्चला विजया एकादशीचं व्रत केलं जाईल.


विजया एकादशी व्रताचे महत्त्व (Viaya Ekadashi Vrat Significance)


विजया एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्रीहरी-विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन-संपत्तीत वाढ होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


 


Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशीला भगवान विष्णूला अर्पण करा 'हे' नैवेद्य; गुरू दोष होईल दूर, वाढेल सुख-समृद्धी