IPL 2024: आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरु होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. या हंगामात मुंबईचं कर्णधारपद हार्दिक पांड्याके सोपवण्यात आले होते. हार्दिक पांड्यानं मुंबईच्या संघातूनच आयपीएलच्या करिअरला सुरुवात केली होती. हार्दिक पांड्या कर्णधार होताच खोटं बोललाय. स्टार स्पोर्ट्सला दिलेलेल्या मुलाखतीदरम्यान हार्दिक पांड्यानं साफ खोटं वक्तव्य केलेय. त्यानं रोहित शर्माचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याचं खोटं एका झटक्यात पकडलं गेलेय.
हार्दिक पांड्या साफ खोटं बोलला -
हार्दिक पांड्यानं 2015 मध्ये मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वात चषकावर नाव कोरलं होतं. हार्दिक पांड्याची कामगिरी त्यावेळी सुमार राहिली होती. पण स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पांड्या सपशेल खोटं बोललाय. त्यानं रोहित शर्माचं क्रेडिट खाण्याचा प्रयत्न केलाय. प्लेऑफ आणि फायनल सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाल्याचं हार्दिक पांड्यानं मुलाखतीत म्हटलेय. तो हंगामा माझ्यासाठी खास होता, असेही त्यानं म्हटलेय. पण इतिहास आणि आकडे पाहिले तर हार्दिक पांड्या खोटं बोलत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
हार्दिक पांड्या काय म्हणाला? पाहा व्हिडीओ
त्या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याची कामगिरी कशी राहिली ?
2015 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्या फलंदाजीमध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता. त्याला एकही धाव करता आली नव्हती. गोलंदाजीमध्येही हार्दिक पांड्याने सपाटून मार खाल्ला होता. हार्दिक पांड्याने चार षटकात 36 धावा खर्च केल्या होत्या. त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.
प्लेऑफच्या सामन्यातही हार्दिक पांड्या फेल ठरला होता. हार्दिक पांड्याला फक्त एक धाव काढता आली होती. त्याने गोलंदाजी केली नव्हती.
प्लेऑफ आणि फायनलच्या सामन्यात मुंबईकडून चमकलं कोण ?
प्लेऑफमध्ये मुंबईकडून कोण कोण चमकलं ?
2015 मधील प्लेऑफच्या सामन्यात मुंबईकडून लिंडल सिमन्स यानं 65 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय कायरन पोलार्ड यानं 41 धावांचं योगदान दिलं होतं. पार्थिव पटेल 35 धावा खेळला होता. तर गोलंदाजीमध्ये लसीथ मलिंगानं तीन विकेट घेतल्या होत्या. हरभजन सिंह आणि विनयकुमार यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या होत्या.
प्लेऑफचा सामनावीर कोण ?
प्लेऑफमध्ये अष्टपैलू खेळी करणाऱ्या कायरन पोलार्ड याला सामनावीर पुरस्कारनं गौरवण्यात आलं होतं. पोलार्डने अवघ्या 17 चेंडूत 41 धावा चोपल्या होत्या. त्याशिवाय तीन षटकात फक्त 22 धावा खर्च केल्या होत्या.
फायनलमध्ये मुंबईकडून कोण कोण चमकलं ?
चेन्नईविरोधात झालेल्या फायनल सामन्यात मुंबईकडून लिंडल सिमन्स यानं 45 चेंडूत 68 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने 26 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. कायरन पोलार्ड यानं 18 चेंडत 36 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत मिचेल मॅकलेघन यानं 4 षटकात 25 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या होत्या. तर लसीथ मलिंगा आणि हरभजन सिंह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या होत्या.
फायनलमध्ये सामनावीर कोण ?
फायनलमध्ये स्फोटक फलंदाजी करणाऱ्या रोहित शर्माला सामनावीर पुरस्कारनं गौरवण्यात आले. रोहित शर्माने 26 चेंडूत 50 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.
2015 मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी कशी राहिली ?
अष्टपैलू हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याने 9 सामने खेळले होते. त्यामधील आठ डावात त्याने फक्त 112 धावा केल्या होत्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 61 इतकी होती. हार्दिक पांड्याने त्या हंगामात 9 चौकार आणि 8 षटकार ठोकले होते. गोलंदाजीमध्येही हार्दिक पांड्या अपयशी ठरला होता. त्याला पूर्ण हंगामात फक्त एक विकेट घेता आली होती.