Vijaya Ekadashi 2024 : आज विजया एकादशी (Ekadashi) आहे आणि आजचा दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. अनेक भक्त देवाची कृपा मिळवण्यासाठी आजच्या दिवशी उपवास ठेवतात. एकादशीचा उपवास ठेवल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होतं, अशी धारणा आहे. एखादी इच्छा ठेवून एकादशीचं व्रत केल्यास ती इच्छा अवश्य पूर्ण होते, असं म्हणतात. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष कृपा मिळवण्यासाठी त्यांना प्रिय असलेले काही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, यामुळे जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील आणि सुख-समृद्धी वाढेल.
पंचामृत अर्पण करा
विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पंचामृत अर्पण करा. यामुळे तुमच्या सौभाग्य सुखात वाढ होईल आणि जीवनात चालू असलेल्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो. जीवनातील सर्व दु:ख दूर होतील. भगवान विष्णूंना पंचामृत अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला पंचामृत अर्पण करावं.
केशर खीर अर्पण करा
विजया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर घालून बनवलेली खीर देखील अर्पण करावी. केशराची खीर भगवान विष्णूंना खूप प्रिय असल्याचं मानलं जातं, त्यामुळे एकादशीच्या दिवशी केशर घालून तयार केलेली खीर देवाला अर्पण करावी. खिरीचा नैवेद्य दाखवताना त्यात तुळशी पानंही टाकावी. भगवान विष्णूंना तुळशीशिवाय बनवलेला प्रसाद अपूर्ण मानला जातो, असं म्हणतात.
केळी अर्पण करा
एकादशीला भगवान विष्णूला केळी अर्पण करा. विष्णूला केळी खूप आवडतात. केळी अर्पण केल्यानं कुंडलीतील गुरु दोषापासून मुक्ती मिळू शकते आणि वैवाहिक जीवनात देखील आनंद राहतो, असं म्हणतात. देवाला केळी अर्पण केल्याने जीवनात त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात.
विष्णूला पिवळी मिठाई अर्पण करा
विजया एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण केल्यास लाभ होतो आणि आर्थिक समस्याही दूर होतात. त्यामुळे एकादशीच्या दिवशी विष्णूला पिवळी मिठाई अर्पण करावी.
धण्याची पंजिरी
भगवान श्रीकृष्णाला धण्याच्या पंजिरीचा प्रसाद खूप आवडतो. भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार मानला जातो. भगवंताला धण्याची पंजिरीचा प्रसाद अर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Vijaya Ekadashi 2024 : आज विजया एकादशी! मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या