Astrology : शुक्र-युरेनसची होणार युती! 2 मे पासून राशींची होणार चांदी; करिअरमध्ये प्रगतीसह धनलाभाचे जुळून येतील योग
Venus Uranus Conjunction 2025 : द्रिक पंचांगानुसार, शुक्र आणि युरेनस ग्रह 2 मे रोजी रात्री 10 वाजून 24 मिनिटांनी युती करणार आहेत. यामुळे अनेक राशींना चांगलाच याचा लाभ मिळणार आहे.

Venus Uranus Conjunction 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2 मेचा दिवस खगोलशास्त्रानुसार, फार महत्त्वाचा आहे. या दिवशी शुक्र आणि युरेनस ग्रह एकमेकांच्या फार जवळ येणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, या घटनेला पूर्ण युती म्हणतात. तर, द्रिक पंचांगानुसार, शुक्र आणि युरेनस ग्रह 2 मे रोजी रात्री 10 वाजून 24 मिनिटांनी युती करणार आहेत. यामुळे अनेक राशींना चांगलाच याचा लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या सुख समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, नशिबाची चांगली साथ मिळेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत चांगली वाढ पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा सपोर्ट पाहायला मिळेल. जे लोक बिझनेस करतायत त्यांना नवीन ऑर्डर्स मिळतील. तुमचं वैवाहिक जीवन अगदी सुरळीत चालेल. तसेच, उत्पन्नाची नवीन साधनं तुमच्यासाठी खुली होतील. पार्टनरबरोबर देखील तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करु शकता.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार प्रगतीचा असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच,जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच नवीन नोकरी मिळेल. आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. या काळात सकस आहार घ्या. आणि नियमित योगासन करा.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार भाग्याचा असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांच्या प्रमोशनमध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल. तुम्ही पार्टनरशिपमध्ये नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तसेच, मुलांचा कल नवीन गोष्टी शिकण्याकडे असेल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. धार्मिक कार्यात तुमचं मन गुंतेल. तसेच, आरोग्य देखील एकदम ठणठणीत राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :




















