Horoscope Today 8 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 8 जून 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज प्रत्येक कामाबाबत तुमचा दृढ निश्चय असेल, तुमची मते तुम्ही बदलणार नाही

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज ज्या गोष्टी गुप्त ठेवायला हव्यात, त्या काही कारणामुळे तुम्हाला दुसऱ्यांना सांगाव्या लागतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज जोडीदाराची थोडक्या कारणावरून खटकेल, धंद्यामध्ये भागीदाराच्या मतांना किंमत द्यावी लागेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो तुमच्यातील कला समाजासमोर येण्यासाठी जे आवश्यक आहे, त्यामध्ये थोडे कमी पडल आणि अस्वस्थ  व्हाल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो चुका या होतात, तसेच त्या दुरुस्तही करता येतात हे लक्षात ठेवलेत, समजून घेतलेत तर आज बरेच काही मिळवून जाल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज महिलांनी कामाची योग्य आखणी करावी, दुसऱ्यावर चटकन विसंबून राहाल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज तुमच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता आहे, सरकारी नोकरीत प्रमोशनच्या संधी येऊ शकतात 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडे अस्थिर आणि चंचल बनाल, प्रकृतीची काळजी मात्र घ्यायला हवी 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो फुप्फुसाचे विकार आहे, त्यांनी वेळेवर औषध उपचार घ्यावेत 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारण्याच्या मार्गावर राहील, नोकरीच्या ठिकाणी चांगले वातावरण लागल्यामुळे काम करायला आनंद वाटेल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज घरामध्ये एखादी चैनीच्या वस्तूची खरेदी कराल, महिला घरातील वातावरणात रमून जातील

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज अतिभावना प्रधान बनाल, कुठेतरी श्रद्धा ठेवून आपले दुःख हलके कराल.

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiac Sign: जूनच्या दुसऱ्या आठवड्यात धनलक्ष्मी राजयोगाचे संकेत, 'या' 5 राशी होणार मालामाल! साप्ताहिक भाग्यशाली राशी जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.