Vastu Tips : आपल्या घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी. तसेच, घरातील वाईट आणि नकारात्मक ऊर्जा दूर व्हावी यासाठी वास्तूशास्त्रात (Vastu Tips) अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहे. या गोष्टींचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टींचं नीट पालन केलं नाही तर लवकरच तुमच्यावर वाईट परिस्थिती ओढावण्याची शक्यता असते अशी मान्यता आहे. 


त्यानुसार, वास्तूशास्त्रात घरात वाईट काळ येण्याआधी नेमके कोणते संकेत मिळतात या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या संदर्भांच्या आधारे तुम्ही तुमच्या घरातील वाईट परिस्थितीला दूर करु शकता. 


घरात वाईट काळ येण्याचे 'हे' आहेत संकेत 


1. घरात संकट आले की, घरातील झाडे पाने सुकायला लागतात - अनेकदा तुम्ही याचं निरीक्षण केलं असेल की, घरातील झाडांना रोज पाणी घालून देखील जर ती सुकत असतील तर याचा अर्थ लवकरच वाईट परिस्थिती ओढावणार आहे. 


2. स्त्रीचा उजवा डोळा आणि पुरुषाचा डावा डोळा फडफडत असेल तर - अनेकदा काही कारण नसताना आपला डोळा फडफडतो. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार हे वाईट काळ येण्याचे लक्षण आहे. 


3. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट काळ सुरु होतो तेव्हा कुत्रा, म्हैस घरातील पाळीव प्राणी मरतो. - असं म्हणतात की, जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या घरावर संकट येणार असतं तेव्हा ते आधी प्राणी आपल्या अंगावर ओढावून घेतात. तुमच्या बाबतीत देखील असा प्रकार घडला असेल तर ही तुमच्यासाठी चेतावणी आहे असं समजा. 


4. घरामध्ये 2 पाल एकमेकांशी भांडण करताना दिसल्या तर समजून जा की हे एखाद्या संकटाचं लक्षण आहे. 


5. दररोज जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तर - खरंतर स्वप्न प्रत्येक व्यक्तीला पडतात. कधी चांगली तर कधी वाईट. मात्र, जर तुम्हाला सलग वाईट स्वप्न पडत असतील तर हे वाईट काळ येण्याचं लक्षण आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:      


Surya Gochar 2025 : रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर सूर्याचं राशी परिवर्तन; 15 मार्चपासून 'या' 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ