Surya Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्य (Sun) प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तन करतात. याचा अनेक राशींवर परिणाम होतो. त्यामुळेच, ज्योतिष शास्त्रात सूर्याच्या संक्रमणाला फार महत्त्व आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यदेव सध्या शनीदेवाच्या कुंभ राशीत संक्रमण करतोय. 14 मार्च रोजी सूर्याचं राशी परिवर्तन होणार आहे. यावेळी कुंभ राशीतून निघून मीन राशीत सूर्याचा प्रवेश होणार आहे. 


14 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी सूर्याचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. या राशीत सूर्यदेव एक महिन्यापर्यंत स्थित असणार आहेत. तर, 14 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे. या दरम्यान काही राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


होळीच्या दिवशी सूर्य देव मीन राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, कामाच्या ठिकाणीसु्द्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा असेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


होळीच्या दिवशी होणारं सू्र्याचं राशी परिवर्तन कुंभ राशीसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरच्या बाबतीत सुरु असलेल्या अडचणींपासून तुमची सुटका होईल. करिअरमध्ये नवे बदल घडून येतील. तसेच, धन-संपत्तीची चांगली भरभराट होईल. या काळात तुम्ही दान-पुण्य देखील करु शकता. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. 


मीन रास (Pisces Horoscope)


सूर्याच्या राशी परिवर्तनाने मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, बेरोजगारांना चांगला लाभ मिळेल. तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना देखील चांगली नोकरी मिळेल. व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                          


Astrology : आज रंगपंचमीच्या दिवशी जुळून आला धन योगाचा शुभ संयोग; कर्क राशीसह 'या' 5 राशींवर धनदेवता होणार प्रसन्न