Vastu Tips : आपल्या आजूबाजूला अनेक वृक्ष (Tree), वनस्पती, रोपं असतात ज्यांच्याबद्दल खरंतर आपल्याला माहितीही नसते. तर, काही रोपं अशी असतात ज्यांचे औषधी गुणधर्म फार असतात. अशी रोपं घरात लावल्याने घरातील वातावरणही शुद्ध राहते आणि आपल्याला ऑक्सिजनही मिळतो. यामधलंच एक रोप म्हणजे क्राशूला वनस्पती. हे एक असं रोप आहे जे घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
त्याचबरोबर, अनेक लोक घरात पैशांची आवक वाढावी, पैसा खेळता राहावा म्हणून घरात मनी प्लांट लावतात. पण, वास्तूशास्त्रात (Vastu tips) म्हटल्याप्रमाणे, धनप्राप्तीसाठी अन्य रोपांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. हे रोप म्हणजे क्राशूला. हे रोप घरात लावल्याने देखील घरात धनसंपत्ती वाढते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
सुख-समृद्धीसाठी घरात लावा क्राशूला
आपल्या घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी असं प्रत्येकाला वाटतं. आपल्या कुटुंबीयांचं आरोग्य नीट राहावं तसेच, घरात कधीच पैशांची कमतरता पडू नये यासाठी प्रत्येक व्यक्ती दिवस-रात्र मेहनत करतो. पण, कधी-कधी अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी तुम्ही वास्तूशास्त्राचा आधार घेऊ शकता. वास्तूशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणींना कमी करता येऊ शकते.
वास्तूशास्त्रानुसार, घर किंवा ऑफिसमध्ये काही झाडे, रोपं लावल्याने घरात सुख आणि शांती येते. क्राशूला हे रोप यापैकीच एक आहे. क्राशूलाचं रोप हे फार चमत्कारिक मानण्यात आलं आहे.
वास्तूशास्त्रानुसार, क्राशूलाचं रोप घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. या रोपाला घरात लावल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात. तसेच, तुमची आर्थिक समृद्धी वाढते. घरातील वाद-विवाद दूर होतात.तसेच, नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता वाढते.
'हे' रोप घरात लावणं शुभ
क्राशूलाचं रोप घरात लावणं फार शुभ मनलं जातं. या रोपाची पानं फार जाड असतात. या वनस्पतीतून ऑक्सिजनही भरभरून मिळतो. या रोपाला पाणी फार कमी लागतं. तसेच, याला जास्त पाणी आणि सावली नाही लागत.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा :