Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani Dev) फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. 30 जूनपासून शनीची वक्री चाल सुरु होणार आहे. शनीच्या (Lord Shani) कुंभ राशीत वक्री चाल चालल्याने काही राशींना सावध राहण्याची गरज आहे तर काही राशींचं भाग्य चमकेल. शनीच्या अशुभ परिणामांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीसाठी शनीची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे. तुमच्या कुटुंबात शांतीचं वातावरण असेल. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, वडिलांच्या सहयोगाने तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


तुमचं मन प्रसन्न असेल. पण, आरोग्याची काळजी घ्या. तसेच, तुमच्या खर्चात जास्त वाढ होऊ शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


या दरम्यान तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमची आठवड्याची सुरुवात चांगली होईल. कुटुंबीयांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. 


कर्क रास (Cancer Horoscope)


तुमच्या वाणीत मधुरता असेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तरी देखील रागावर नियंत्रण ठेवा. जोडीजाराचा चांगला पाठिंबा मिळेल, आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह रास (Leo Horoscope)


या दरम्यान तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. पण, मनातून तुम्ही खूप तणावात असाल. आई-वडिलांचा सहवास मिळेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होईल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


या दरम्यान तुम्हाला एखादी चिंता सतत जाणवेल. तसेच, तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. तसेच, शैक्षणिक कार्यात तुम्हाला यश मिळेल. 


तूळ रास (Libra Horoscope)


या कालावधीत तुमचं मन तर प्रसन्न असेल पण तुमच्या आत्मविश्वास कमी असेल. शैक्षणिक कार्यात सुधार होईल. कला किंवा संगीत संबंधित तुमची आवड वाढेल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


या दरम्यान तुम्ही मानसिकरित्या चिंतेत असाल. तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल. विनाकारण कोणाचाही राग करू नका. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


तुमचे मन प्रसन्न असेल. तुमच्यात आत्मविश्वास भरभरून असेल. तसेच, तुमच्यासाठी नोरीचे अनेक पर्याय खुले होतील. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांना सतत चिंता सतावेल. धैर्यशीलता ठेवा. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


या काळात तुमच्या मनाता अनेक विचार सुरु असतील. फक्त रागावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. 


मीन रास (Pisces Horoscope)


तुमच्या मनात अनेक विचार सुरु असतील. त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा :


Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या