Weekly Numerology Horoscope 17 to 23 June 2024 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे, अंकशास्त्राद्वारे (Numerology) व्यक्ती त्याचे भविष्य, व्यक्तिमत्व इत्यादी जाणून घेता येते. यामध्ये फरक एवढाच आहे की, अंकशास्त्रात (Ank Shastra) जन्मतारखेपासून मिळालेल्या रेडिक्स क्रमांकावरून भविष्य ठरविता येते. खरंतर मूलांक म्हणजे जन्मतारखेची बेरीज. उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असेल. सर्व मूलांक राशीच्या लोकांसाठी त्यांच्या वाढदिवसानुसार जूनचा नवीन आठवडा कसा असेल ते जाणून घेऊयात. 


मूलांक 1


तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतील. करिअरमध्ये काही साध्य करता येईल. सर्वांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांती मिळेल. पण या सगळ्यात तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 


मूलांक 2


तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वैयक्तिक आयुष्यही चांगले राहील. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. करिअरमध्ये बदल होऊ शकतो. 


मूलांक 3


तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते. तुमची स्थिती, पैसा आणि आर्थिक स्थिती सुधारेल. यामुळे तुमच्या जीवनशैलीत मोठे बदल होतील. 


मूलांक 4


करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. तुम्ही पुढे येऊन जबाबदारी घेतलीत तर तुम्हाला फायदा होईल. ज्येष्ठांच्या सल्ल्याचे पालन करा. प्रवासाची शक्यता आहे. आर्थिक नियोजन करा. भविष्यात याचा फायदा होईल. 


मूलांक 5


करिअरमधील समस्या दूर होतील. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमची कामगिरी चांगली राहील. व्यावसायिक जीवनाप्रमाणे वैयक्तिक जीवनातही सकारात्मक बदल होतील. कुटुंबीयांबरोबर सहलीला जाऊ शकता. व्यवसायात लाभ होईल. 


मूलांक 6


हा आठवडा तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जीवन हुशारीने हाताळा. राग टाळा आणि शांतपणे करिअर वाढीच्या नवीन संधींवर लक्ष ठेवा. उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय शोधा. 


मूलांक 7


तुमच्यासाठी हा काळ शुभ आहे. तुम्हाला मोठे यश मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. 


मूलांक 8


तुम्हाला नशीबाची चांगली साथ मिळेल. सकारात्मक परिणाम मिळतील. करिअरमध्ये यशाच्या पायऱ्या चढतील. कुटुंबियांबरोबर वेळ घालवा. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. 


मूलांक 9


नवीन कार्य सुरू करण्यासाठी आणि कोणतीही योजना राबविण्यासाठी वेळ अतिशय शुभ आहे. जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतील. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवड्यात ग्रहांच्या मोठ्या हालचाली; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नोकरी-व्यवसायात यशासह होणार बक्कळ धनलाभ