Vastu Tips : धर्मग्रंथानुसार काही झाडे दैवी शक्तीने परिपूर्ण आहेत. हिंदू धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते, कारण त्यांना देवी-देवतांचे निवासस्थान मानले जाते. या वृक्षांमध्ये पळस देखील महत्त्वाचा वृक्ष मानला जातो. वास्तूनुसार पळस वृक्षात त्रिदेव (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) वास करतात. माता लक्ष्मीला पळसाची फुले खूप प्रिय आहेत. पळसाच्या फुलांना तेसू फुले असेही म्हणतात. हे फूल दिसायला जितके सुंदर आहे तितकेच याचे चमत्कारी उपाय देखील आहेत.
पालाश फुलांचे उपाय
- पांढऱ्या कपड्यात पळसाची फुले आणि नारळ ठेवून घरामध्ये धन असलेल्या ठिकाणी ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात पैशाचा साठा भरतो. जर पळसाची ताजी फुले उपलब्ध नसतील तर तुम्ही वाळलेल्या फुलांनीही हा उपाय करू शकता.
- शुक्रवारी पळस वृक्षाची पूजा करावी, यामुळे देवी लक्ष्मी तसेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद होतो आणि भौतिक सुखात वृद्धी होते. पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांनी या दिवशी पळस वृक्षाची पूजा करावी, ते त्यांना दुप्पट फळ देईल.
- आरोग्याच्या फायद्यासाठी, रविवारी शुभ मुहूर्तावर पळसाच्या झाडाचे मूळ आणा. त्यात कापसाचा दोरा गुंडाळा आणि उजव्या हाताला बांधा.असे केल्याने रोगी लवकर निरोगी होतो असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या
- Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे..