Vastu Tips For Name Plate : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जीवनात सुख-शांती, समृद्धी हवी असेल तर वास्तूच्या (Vastu Tips) नियमांचं पालन करणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, वास्तूच्या (Vastu Shastra) नियमानुसार, घरात वस्तू नियमित जागेवर ठेवल्याने तसेच सजवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढून जीवनात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. लव्ह लाईफ, करिअर, आर्थिक बाबतीत तसेच आरोग्यासह आपल्या जीवनावर याचा चांगला परिणाम होतो. 


वास्तूशास्त्रानुसार, घराच्या बाहेर नावाची पाटी अर्थात नेम प्लेट लावण्याचाही आपल्या जीवनावर फार परिणाम होतो. यासाठी नेम प्लेट लावताना वास्तूशी संबंधित काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. वास्तूच्या नियमांनुसार घरात नेमकी कशी नेम प्लेट लावावी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


नेम प्लेटनुसार वास्तूचे 'हे' नियम जाणून घ्या 



  • वास्तूच्या नियमांनुसार, घराच्या बाहेर आयताकृती आकाराची नेमप्लेट लावावी. 

  • गोलाकार किंवा त्रिकोणी आकाराची नेमप्लेट कधीही लावू नये. 

  • तसेच, तुम्ही जी नेमप्लेट लावत आहात ती अंधुक अभरात नाही याची काळजी घ्यावी. नेमप्लेटवरील सर्वच शब्द स्पष्ट दिसावेत. 

  • वास्तूशास्त्रानुसार, घराच्या बाहेर उत्तर किंवा पूर्व दिशेला नेमप्लेट लावावी. ही दिशा योग्य मानण्यात आली आहे. 

  • या व्यतिरिक्त ईशान्य कोनातसुद्धा तुम्ही नेमप्लेट लावू शकता. 

  • वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, नेमप्लेटला घराच्या डाव्या बाजूला लावणं शुभ मानण्यात आलं आहे. 

  • पण, नेमप्लेट लावताना एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की, ती तुटलेली नसावी. 

  • तसेच, नेमप्लेटवर गणपतीचं स्वस्तिक असणं फार शुभ मानलं जातं. 

  • नेमप्लेटची पॉलिश जर उतरली असेल किंवा तुटलेली असेल तर ती लगेच हटवा. 

  • वास्तूशास्त्रातील नियमांत सांगितल्याप्रमाणे, नेमप्लेटच्या साफसफाईची देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. 

  • तुम्ही तांबे,स्टील किंवा पितळेच्या धातूची नेमप्लेट घरात लावू शकता. 

  • मान्यतेनुसार, प्लास्टिक किंवा दगडापासून बनविलेली नेमप्लेट घरात लावू नये. 

  • तसेच, पांढऱ्या, पिवळ्या किंवा केशरी रंगाशी संबंधित नेमप्लेट लावणं शुभ मानलं जातं. 

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नेमप्लेटच्या मागे कोळ्याचं जाळं, पाल किंवा चिमणीचं घरटं असणार नाही याची काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Devshayani Ekadashi 2024 : देवशयनी एकादशीच्या दिवशी चुकूनही 'ही' 6 कामं करू नका; जाणून घ्या काय करावं आणि काय करू नये