Devshayani Ekadashi 2024 : आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीपासून (Devshayani Ekadashi) चातुर्मासाला सुरुवात होते. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यापर्यंत निद्रा अवस्थेत असतात. देवशयनी एकादशी देखील याच एकादशीमधील एक आहे. देवशयनी एकादशी आजपासून सुरु झाली आहे. 


आजपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी उपवास ठेवल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते.  त्यामुळे एकादशीच्या दिवशी चुकूनही काही चुका करणं कटाक्षानं टाळावं. तसेच, या दरम्यान काही कार्य करणं शुभ देखील मानलं जातं. 


देवशयनी एकादशीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका 


देवशयनी एकादशीच्या दिवशी चुकूनही पानाचं सेवन करू नये. खरंतर, पानाचं सेवन केल्याने रजोगुणाची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे या दिवशी पान खाणं वर्ज्य मानलं जातं. 


कोणाचीही निंदा, हिंसा करू नका


देवशयनी एकादशीच्या दिवशी क्रोध, हिंसा, चोरी, चुगली इ. कामं करू नये. जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या मान-सन्मानात वाढ होणार नाही. त्याचबरोबर तुमचा अपमान देखील होण्याची शक्यता आहे. 


महिलांनी केस धुवू नयेत


देवशयनी एकादशीच्या दिवशी महिलांनी चुकूनही आपले केस धुवू नयेत. त्याचबरोबर आजच्या दिवशी नखं कापू नयेत, केस कापू नयेत. असं करणं शुभ मानलं जातं. 


काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका 


देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका. त्याचबरोबर महिलांनी पूजेच्या वेळी आपले केस मोकळे सोडू नयेत. 


तामसिक पदार्थांचं भोजन करू नका 


देवशयनी एकादशीच्या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करू नका. या दिवशी लसूण, कांदा यांसारख्या पदार्थांचं सेवन चुकूनही करू नये. त्याचबरोबर मांसदेखील खाऊ नये. 


तुळशीच्या पानांना स्पर्श करू नका 


देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना चुकूनही स्पर्श करू नका. त्याचबरोबर तुळशीची पानं तोडू नका. जर तुम्हाला प्रसादासाठी तुळशीच्या पानांचा वापर करायचा असेल तर आधीपासून तोडलेले पानं वापरा. 


देवशयनी एकादशीच्या दिवशी 'ही' कामं करा 



  • देवशयनी एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करणं फार शुभ मानलं जातं. 

  • तसेच, देवाची पूजा केल्यानंतर लोकांना मिठाई, अन्न, फळ, वस्त्र इ. गोष्टींचं दान करणं पुण्याचं काम मानलं जातं. यामुळे व्यक्तीला जीवनात कोणतीच कमी भासत नाही. 

  • या दिवशी दूध आणि दहयाचं सेवन करावं. यामुळे आयुष्यातील संकटं दूर होतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीला करा 'हे' 5 उपाय; जीवनातील सारे दु:ख झटक्यात होतील दूर, विठुरायाचा लाभेल प्रत्येक टप्प्यावर आशीर्वाद