Vastu Tips For Money : वास्तू शास्त्रानुसार (Vastu Shastra), प्रत्येक दिशेची एक वेगळी ऊर्जा असते. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूची देखील विशेष ऊर्जा असते. जर, एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवली तर घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्याचप्रमाणे कचरा टाकण्यासाठी वापरली जाणारी डस्टबिन ही देखील प्रत्येक घरात आढळणारी महत्त्वाची वस्तू आहे. पण, जर हीच डस्टबिन तुम्ही चुकीच्या ठिकाणी ठेवली तर त्याचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. 


वास्तू शास्त्रात डस्टबिनशी संबंधित काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर धनहानी देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे या नियमां संदर्भात वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय हे जाणून घेऊयात. 


'या' दिशेला डस्टबिन कधीही ठेवू नका 


वास्तू शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी डस्टबिन ठेवली तर देवी लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, वास्तू शास्त्रानुसार, कधीही घरातील डस्टबिनला उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका. घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवलेली डस्टबिन तुमच्या आयुष्यात तणाव, अशांतता पसरविण्याचं काम करते. यामुळे घरातील व्यक्ती नेहमी तणावात असतात. 


तसेच, घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला डस्टबिन ठेवल्यास धनहानी होते. अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. तर, घरातील पैसा पाण्यासारखा वाहत जातो. कर्जाचा डोंगर वाढतो. घरातील सदस्यांच्या नोकरी-व्यवसायात प्रगती होत नाही. त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. 


घराच्या 'या' दिशेला ठेवा डस्टबिन 


वास्तू शास्त्रानुसार, घरातील डस्टबिनला नेहमी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणं योग्य आहे. याचं कारण म्हणजे, घराची दक्षिण-पश्चिम दिशा विसर्जन करण्यासाठी चांगली मानली जाते. त्यामुळे तुम्ही उत्तर-पश्चिम दिशेला डस्टबिन ठेवू शकता. 


'या' दिशेला डस्टबिन ठेवू नका 



  • घरातील कचऱ्याला कधीही घराच्या बाहेर ठेवू नका. विशेषत:घराच्या मुख्य द्वाराजवळ कधीही डस्टबिन ठेवण्याची चूक करु नका. 

  • तसेच, किचन, पूजा घर आणि बेडरुममध्ये देखील डस्टबिन ठेवू नका. 

  • घरातील तिजोरीजवळ, तुळशीच्या रोपाजवळ कधीच डस्टबिन ठेवण्याची चूक करु नका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Janmashtami 2024 : जन्माष्टमीला 'असं' सजवा तुमच्या श्रीकृष्णाला! वाचा श्रृंगाराची आणि पूजेच्या साहित्याची संपूर्ण लिस्ट; आत्तापासूनच तयारी करा