Janmashtami 2024 Puja Samagri : श्रावण (Shravan) महिन्यात जन्माष्टमीचा पवित्र सणदेखील साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस हा जन्माष्टमी (Janmashtami) म्हणून साजरा करतात. यंदा हा सण 26 ऑगस्ट रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. या दरम्यान सर्व भक्त भगवान श्री कृष्णाची पूजा करतात. त्यांच्यासाठी उपवास ठेवतात. तसेच, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करतात.
हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे पूजेची तयारी करताना त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
जन्माष्टमीसाठी लागणारे पूजा साहित्य (Janmashtami 2024 Puja Samagri)
जन्माष्टमीची पूजा करण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे साहित्य लागेल. धूप, अगरबत्ती, कुंकू, अबीर, गुलाल, केशर, कापूर, शेंदूर, चंदन, यज्ञोपवीत 5, पाने, सुपारी, फुलांच्या माळा, हळद, आभूषण, कापूस, तुळस माळ, गंगाजल, मध, अलंकार,दूर्वा, पंचमेवा, साखर, गायीचं तूप, गाईचं दूध, फळं, छोटी इलायची, आसन आणि मिठाई इ. साहित्य तयार ठेवावे.
जन्माष्टमी 2024 शुभ मुहूर्त (Janmashtami 2024 Puja Muhurta)
कृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ मध्यरात्री 12 ते 12.45 पर्यंत असेल. यंदा बाळगोपाळची पूजा करण्यासाठी 45 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. तुम्हाला 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल.
जन्माष्टमीला 'असं' सजवा तुमच्या श्रीकृष्णाला!
- भाविक भगवान श्रीकृष्णाला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणेच मानतात.
- कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वात आधी त्यांना स्नान घालतात.
- त्यानंतर पिवळे, हिरवे, लाल, मोरपंखी रंगाचे कपडे घालतात.
- विविध रंगीबेरंगी वस्त्रे तुम्ही श्रीकृष्णाला घालू शकता.
- यानंतर, त्यांना सिंहासनावर बसवा.
- बासरी कान्हाला फार प्रिय आहे. बासरीशिवाय बाळकृष्णाचा श्रृंगार अपूर्ण आहे.
- श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी त्यांनी मोराचा मुकुट घालतात.
- यानंतर त्यांच्या कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावावा. असे केल्याने कृष्ण प्रसन्न होतो आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो अशी मान्यता आहे.
- जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळांना मोत्यांची माळ किंवा वैजयंती हार घालावा.
- या दिवशी कृष्णाला पिवळ्या किंवा लाल फुलांनी बनवलेली माळही घालतात.
- पूजेच्या वेळी बाळगोपाळाला चांदीची, सोन्याची किंवा रंगीबेरंगी बांगडी घालावी.
- कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला सजवताना शक्य असल्यास सोन्याचे, चांदीचे किंवा मोत्याचे कानातले घालावेत.
- श्री कृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी बालगोपाळांना चांदीचे पैंजण घालावे. तसेच कंबरेवर कंबरपट्टा घालावा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :