Vastu Tips : घराचे वास्तुशास्त्र असणे खूप महत्वाचे आहे. यामुळे कुटुंबात कोणतीही कमतरता भासत नाही. घराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे ड्रॉइंग रूम. ही ड्रॉईंग रूम वासूतु टिप्सनुसार ठेवली पाहिजे. घर आणि ड्रॉईंग रूम/गेस्ट रूम वास्तुशास्त्रानुसार असेल तर घरात राहणारे लोक निरोगी आणि आनंदी राहतात असा समज आहे. त्या घरात सकारात्मकता, सुख आणि समृद्धी राहते. असं असलं तरी, पाहुण्यांची खोली सजवून घरातील लोकांप्रती येणाऱ्या पाहुण्यांच्या मनात सुंदर आणि सकारात्मक विचार कायम राहतो. त्याचा परिणाम घर आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सकारात्मक असतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सौहार्द वाढतो.
असे म्हणतात की ज्या घरात शांती आणि सौहार्द असते. तिथे माता लक्ष्मी वास करते. लक्ष्मीच्या वासामुळे घरात दरिद्री राहत नाही. चला जाणून घेऊया वास्तूनुसार ड्रॉईंग रूम कशी सजवायची?
ड्रॉईंग रूमसाठी वास्तु उपाय
वास्तूनुसार ड्रॉईंग रूमचे बांधकाम उत्तरेकडून पूर्वेकडे आणि उत्तरेकडून पश्चिमेकडे असावे.
ड्रॉईंग रूमच्या खिडक्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असाव्यात. त्यामुळे पुरेसा प्रकाश व हवा घरात राहते.
ड्रॉईंग रूम बनवताना हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे छत आणि मजला दोन्ही इतरांपेक्षा कमी असावेत.
ड्रॉईंग रूमचे गेट पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
ड्रॉईंग रूममध्ये ठेवलेल्या सोफा, खुर्ची, दिवाण इत्यादींची व्यवस्था दक्षिण आणि पश्चिम दिशेला करावी.
ड्रॉईंग रूममध्ये घराच्या प्रमुखाची बसण्याची जागा अशा ठिकाणी असावी की त्यांची बसण्याची जागा उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' राशीच्या लोकांना त्रास देण्यासाठी येणार शनि, चुकूनही करून नका 'हे' काम
- Mars Transit 2022 : 'या' राशींच्या लोकांच्या वाढणार अडचणी
- Astrology : 'या' राशींच्या व्यक्ती पैशांचा करतात योग्य वापर