Astro Tips For Food : ज्योतिषशास्त्रीय भाषेत घराच्या बेडरुमला शय्या भाव म्हणतात. आपण चांगली झोप घेण्यासाठी बेड वापरतो. झोपेला जीवनात खूप महत्त्व आहे, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंथरुण पूर्णपणे व्यवस्थित आणि नीट केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल. उत्साही राहून तुम्ही तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामं करू शकाल. तसं, झोप हा अर्ध-मृत्यूचा प्रकार मानला जातो.
बेडवर बसून खाणं अत्यंत चुकीचं
बेड किंवा पलंग हा फक्त झोपण्यासाठी असतो, इतर कोणत्याही कामांसाठी नाही. तुम्ही पाहिलं असेल की, बरीच लोकं आपली सगळी कामं बेडवर बसून करतात. जसं, मुलं त्यावर बसून अभ्यास करतात, वडीलही त्यावर बसून काम करतात, काही लोक अगदी बेडवर बसून जेवतात सुद्धा. तुम्हीही असं करत असाल तर आजपासूनच बेडवर बसून खाणं बंद करा. बिछान्यावर बसून जेवण्याचे काय तोटे (Vastu Tips) आहेत, जाणून घेऊया.
अंथरुणावर बसून जेवल्याने लक्ष्मी नाराज होते
वास्तूनुसार, अंथरुणावर बसून जेवल्याने आरोग्याला हानी तर होतेच, पण घरावर आर्थिक संकटही ओढावते. वास्तुशास्त्रानुसार, अंथरुणावर बसून जेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि ती त्या घरात कधीच टिकत नाही. ज्या घरात लोक अंथरुणावर बसून जेवतात, त्या घरात गरिबीचं वास्तव्य असतं. घरात कधीच शांति राहत नाही आणि कुटुंबातील सदस्यांवर कर्जाचा डोंगर वाढत जातो. अंथरुणावर बसून जेवल्याने आर्थिक हानी होते, पैसा टिकत नाही.
वास्तूनुसार जेवण करण्याचे नियम
बेडरुममध्ये जेवण केल्याने धनाची देवी लक्ष्मीला राग येतो. घरामध्ये जागेची कमतरता असल्यास स्वयंपाकघरात गालिचा किंवा चटई पसरवून तुम्ही त्यावर बसून जेऊ शकता. जेवणाचा टेबल (Dining Table) नसेल तर तुम्ही अभ्यासाच्या टेबलावर किंवा सोफ्यावर बसूनही जेऊ शकता. जर तुम्हाला बसता येत नसेल तर खुर्चीत बसून जेवा आणि समोर टेबलवर ताट ठेवा, पण जेवणाचे ताट हातात धरून जेवू नये हे लक्षात ठेवा, यामुळे हातात पैसा टिकत नाही, असे मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: