Lakshmi Narayan Yog In Makar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर आपली राशी बदलतात. ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. त्याच प्रमाणे आता बुध आणि शुक्र हे ग्रह राशी बदलत आहेत, यानंतर मकर राशीत या दोन्ही ग्रहांचा संयोग होईल. हे दोन ग्रह एकत्र आल्यामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. या शुभ योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद पसरेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, सुख आणि संपत्तीचा कारक शुक्र 12 फेब्रुवारी 2024 रोजी पहाटे 4 वाजून 41 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करत आहे, ज्या राशीत बुद्धीचा दाता बुध आधीच विराजमान आहे. मकर राशीतील या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. ज्याचा फायदा मेषसह 3 राशींना (Zodiac Signs) होणार आहे, या राशींबद्दल जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या दहाव्या घरात लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे, अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. या काळात व्यवसायाशी निगडीत लोक प्रचंड यश मिळवू शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या कालावधीत गुंतवणुकीतून तुम्हाला नक्कीच फायदा मिळू शकेल. शुक्राच्या प्रभावामुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. यासोबतच जीवनात सकारात्मक परिणाम दिसेल. आरोग्यही चांगले राहील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग खूप फायदेशीर ठरू शकतो. या योगामुळे तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. शुक्र आणि बुध तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणतील. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, यासोबतच तुम्हाला संभाव्य आर्थिक लाभही मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रचंड यशासह बढती मिळू शकते. वरिष्ठही तुमच्या कामावर खूश असतील, यामुळे तुम्हाला तुमच्या पगारात वाढीसोबत काही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमचे कौटुंबिक जीवनही चांगले राहणार आहे. मुलांकडूनही अनेक शुभवार्ता मिळू शकतात, तुमचे आरोग्यही चांगले राहील.
मकर रास (Capricorn)
या राशीच्या चढत्या घरात लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे, याचा मकर राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतो. करिअरबद्दल तुमची प्रगती होईल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमचे परिश्रम पाहून उच्च अधिकारी तुमची बढती करू शकतात. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्यांची देखील प्रगती होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने व्यवसायात भरीव वाढ होऊ शकते, यासोबतच तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कुटुंब आणि मित्रांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: