Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात गोमती चक्राचे अतिशय उपयुक्त दगड म्हणून वर्णन केले आहे. हा एक खास प्रकारचा छोटा दगड आहे, जो गोमती नदीत सापडतो. त्याचा रंग पांढरा असून वजनाने तो हलका आहे. गोमती चक्राच्या एका भागात एक गोलाकार वर्तुळासारखा आकार नैसर्गिकरित्या तयार होतो. असे म्हणतात की हा दगड ज्या घरात असतो तिथे सुख-समृद्धी टिकून राहते. शिवाय त्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दरवाजे उघडतात.  


वास्तू दोषांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी घर बांधताना आग्नेय दिशेला इमारतीच्या पायामध्ये 11 सिद्ध गोमती चक्र ठेवावीत.
आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून 21 वे सिद्ध अभिमांतिक गोमती चक्र फिरवून आजारी व्यक्तीच्या पलंगावर बांधावे. या उपायाने आजारी व्यक्ती लवकर बरा होतो.
 एखाद्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर त्याने गोमती चक्राची माला धारण करावी. या उपायाने खूप फायदा होईल.
मुलांच्या शिक्षणात काही अडचण असल्यास सोमवारी भगवान शंकराला पाणी अर्पण करून 11 गोमती चक्रे गंगाजलाने धुवावीत आणि मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत लाल कपड्यात बांधावीत.
वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 11 सिद्ध गोमती चक्र पांढऱ्या कपड्यात बांधून घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्या.
तुम्ही काही कामासाठी जात असाल तर 11 गोमती चक्र तुमच्या खिशात ठेवा. तुमचे काम नक्की होईल. 
सात सिद्ध गोमती चक्रे लाल कपड्यात गुंडाळून लॉकर किंवा कॅश बॉक्समध्ये ठेवल्यास कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
मुलाला नजर लागली असेल तर तीन गोमती चक्रे काळ्या कपड्यात काळ्या धाग्याने बांधून गळ्यात बांधावीत.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :