Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, घरात झाडं-झुडपं लावणं, छोटी बाग असणं ही फार सामान्य बाब आहे. मात्र, घरात नेमकी कोणती झाडं-झुडपं लावली पाहिजेत आणि कोणती लावू नयेत या गोष्टीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानुसार, या ठिकाणी आपण घरात लिंबाचं झाड (Lemon) लावण्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. कारण घरात लिंबाचं झाड लावणं शुभ की अशुभ असतं याबाबत वास्तूचे (Vastu Tips) नियम नेमके काय सांगताय ते जाणून घेऊयात.
घरात लिंबाचं रोप लावणं शुभ की अशुभ?
- वास्तूशास्त्रानुसार, लिंबाचं रोप घराच्या मुख्य दारापाशी तसेच, घराच्या आत खोलीत लावू नये. तर तुम्ही घराच्या खिडकीत, बाल्कनीत किंवा घराच्या आसपासच्या गार्डनजवळ तुम्ही लिंबाचं रोप लावू शकता.
- लिंबाच्या रोपाला काटे असल्यामुळे यामुळे घरात नकारात्मकता येत नाही. तसेच, घरात सुख-समृद्धी देखील टिकून राहते. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं.
- लिंबाचं झाड घराच्या अगदी समोर लावल्याने घरात मानसिक तणाव वाढतो तसेच धन हानी देखील होण्याची शक्यता जास्त वाढते.
लिंबाच्या रोपाची योग्य दिशा कोणती?
- वास्तूशास्त्रानुसार, लिंबाच्या रोपाला तुम्ही घराच्या उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य कोनाला लावल्यास शुभ प्रभाव मिळण्यास मदत होते.
- घराच्या मुख्य दारापाशी लिंबाचं रोप लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात. मात्र, रोप घराच्या अगदी जवळ नसेल याची काळजी घ्यावी.
- बाग किंवा घराच्या अंगणात तुम्ही दक्षिण-पूर्व दिशेला रोप लावू शकता. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
- घराच्या बाल्कनीत किंवा छतावर जिथे ऊन आणि हवा असेल अशा ठिकाणी तुम्ही लिंबाचं रोप लावू शकता. घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लिंबाचं रोप लावल्याने व्यवसायात चांगला नफा मिळतो. आणि करिअरमध्ये प्रगती दिसून येते.
लिंबाच्या रोपाचा 'या' ग्रहांशी संबंध
- शनि ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी तुम्ही घरात लिंबाचं रोप लावू शकता.
- तसेच, जर राहू आणि केतूचा प्रभाव कमी करायचा असेल तर लिंबाचं रोप घरात लावणं शुभ मानलं जातं.
- ज्यांच्या कुंडलीत जर ग्रह दोष सुरु असेल तर लिंबाच्या रोपात जल अर्पण करणं लाभदायी ठरु शकतं.
- नजर दोष दूर करायचा असेल तर घराच्या मुख्य दाराजवळ लिंबू किंवा हिरवी मिरची शनिवारच्या दिवशी तुम्ही लावू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :