Grah Gochar 2025 : वैदिक शास्त्रानुसार, 28 नोव्हेंबर रोजी शनी (Shani Dev) सरळ चाल चालणार आहे. शनि 28 नोव्हेंबर 2025 पासून ते 27 जुलै 2026 पर्यंत मार्गी असणार आहेत. त्याच्या पुढच्याच दिवसापासून म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी बुध (Mercury) ग्रह वृश्चिक राशीत मार्गी चाल चालणार आहेत. या व्यतिरिक्त, 23 नोव्हेंबर रोजी राहू शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
ज्योतिष शास्त्रात, शनि-बुध ग्रहाचं मार्गी होणं फार खास मानलं जाणार आहे. यामुळे अनेक राशींच्या जीवनात बदल घडून येणार आहेत. तर, राहू ग्रह स्वत:च्याच नक्षत्रात म्हणजेच शतभिषा नक्षत्रात तब्बल 12 वर्षांनंतर प्रवेश करणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल.
ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा शनि, बुध आणि राहू ग्रह एकत्र आपल्या चालीत परिवर्तन करणार आहेत. याचा थेट मानवी जीवनावर आणि देशभरात प्रभाव पाहायला मिळेल. ग्रहांच्या या युतीमुळे अनेक राशींच्या जीवनात नकारात्मक प्रभाव पाहायला मिळेल. मात्र, या दरम्यान ही युती काही राशींच्या जीवनात चांगले बदल घडवून आणेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनि-बुध ग्रहाचं मार्गी होणं आणि राहू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फार खास असणार आहे. या युतीमुळे आर्थिक, सामाजिक आणि धन-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. कुटुंबियांबरोबर तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनि-बुध ग्रहाची मार्गी चाल कुंभ राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात पती-पत्नीच्या नात्यात गोडवा दिसून येईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याचे योग जुळून येणार आहेत. तसेच, या काळात पैशांची गुंतवणूक करणं देखील तुमच्यासाठी लाभदायी ठरु शकतं. आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :