Vastu Shashtra : वास्तुशास्त्रात घरामध्ये फोटो लावण्यासाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. विशेषत: जेव्हा आपण आपल्या मुलांचे फोटो ठेवतो तेव्हा या नियमांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे ठरते. या नियमांचे पालन केल्याने तुमच्या घरात प्रेम आणि आनंदाचे वातावरण राहते. काय आहेत नियम जाणून घ्या
लहान मुलांचे फोटो लावण्यापूर्वी वास्तुचे 'हे' नियम
आपण सर्वजण आपल्या मुलांचे फोटो आपल्या घराच्या भिंतीवर मोठ्या प्रेमाने लावतो. त्यांच्या बालपणीचे अविस्मरणीय क्षण फोटोंमध्ये पाहून पालकांचे मन आनंदाने भरून येते. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, हे फोटो भिंतीवर लावताना चूक केल्यास तुम्हाला महागात पडू शकते. आपल्या घरात आणि जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा संतुलित करण्यात वास्तू महत्त्वाची भूमिका बजावते. घरामध्ये वास्तुदोषामुळे आर्थिक संकट, आजारपण, कलह यांसारख्या समस्या येत राहतात.खरे तर लहान मुलांचे फोटो भिंतीवर लावण्याबाबत वास्तुशास्त्रात काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम लक्षात घेऊन जर तुम्ही तुमचे घर लहान मुलांच्या फोटोंनी सजवले तर तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न होईल, तसेच तुमचे एकमेकांमधील प्रेम वाढेल. हे नियम काय आहेत? जाणून घ्या.
या दिशेला लावा तुमच्या मुलांचे फोटो
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची पश्चिम दिशा संततीशी संबंधित आहे. लहान मुलांचे फोटो या दिशेला लावणे खूप शुभ मानले जाते.
तुमच्या मुलांचा फोटो इथे लावल्याने ते अभ्यासात अधिक हुशार होतात आणि आयुष्यात नेहमी पुढे जातात.
जर तुम्हाला एकच मुलगा असेल तर तुम्ही त्याचा फोटो दक्षिणेच्या भिंतीवर लावू शकता.
असे केल्याने, तुमचा मुलगा लवकरच जबाबदार बनतो आणि संपूर्ण कुटुंब एकट्याने हाताळण्याचे धैर्य त्याला प्राप्त होते.
ही दिशा घराच्या मालकाशी संबंधित आहे, म्हणून तुम्ही तुमच्या एकुलत्या एक मुलाचे चित्र देखील येथे लावू शकता.
तुमच्या मुलाचा फोटो पूर्व दिशेला लावल्याने तुमचे मूल तेजस्वी आणि उत्साही बनते. जीवनात यशस्वी स्थान निर्माण करतो आणि देवाचे आशीर्वाद नेहमी त्याच्या पाठीशी राहतात.
मुलांचे फोटो घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावे. ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांसह फोटोमध्ये असाल.
वास्तविक, या दिशेला कौटुंबिक फोटो लावणे सर्वात शुभ मानले जाते.
कौटुंबिक फोटो येथे ठेवल्याने कौटुंबिक संबंध मजबूत होतात.
कुटुंबातील सर्व लोकांमध्ये एकता आणि चांगले संबंध टिकून राहतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या
Vastu Tips: घरातील 'या' संकेतांकडे करू नका दुर्लक्ष! असू शकतो वास्तूदोषाचा इशारा, लगेच सावध व्हा