Vastu Tips : वास्तुशास्त्रात दोन प्रकारच्या शक्तींचा उल्लेख केला आहे. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा असते. या शक्तींचा प्रभाव घरावर आणि घरात उपस्थित लोकांवर पडतो. घरात सकारात्मक ऊर्जा असल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. तर, नकारात्मक ऊर्जा ही घर आणि कुटुंबात समस्या निर्माण करते.


 


घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी काही वास्तु उपाय
वास्तुशास्त्रानुसार काही योग्य दिशा, स्थान याविषयी सांगण्यात आल्या आहेत. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. आपल्या जीवनात तसेच घर, कुटुंबासाठी वास्तू महत्त्वाची भूमिका बजावते. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा संतुलित करण्यात याची सर्वात मोठी भूमिका असते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात वास्तुदोष आहे की नाही? हे कसे कळेल? वास्तुदोष असला तरी घराचा कोपरा, योग्य दिशा किंवा ठिकाण काय आहे? हे पाहणे महत्वाचे असते.



घरातील वास्तुदोषांमुळे या समस्या उद्भवतात


संतती प्राप्तीसाठी अडथळा
लग्नाच्या अनेक वर्षानंतरही जर पती-पत्नीला मूल होत नसेल तर ते वास्तुदोषामुळे असू शकते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात संतती सुखाची कमतरता किंवा कुटुंबाच्या वाढीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, त्या घराच्या मध्यभागी वास्तुदोष असतो. असे म्हटले जाते


 


कामाचा सतत खोळंबा
खूप मेहनत करून सुद्धा अनेक घरांमध्ये काम होत नाही. काही कामे होत असता बिघडतात. मग ते काम कितीही कष्टाने केले तरी काहीही फायदा नसतो. कामात यश न मिळणे हे घराच्या मध्यभागी असलेल्या वास्तू दोषाशी देखील संबंधित आहे. शौचालय बनवणे किंवा घराच्या मध्यभागी कोणतीही जड वस्तू ठेवल्याने हा दोष निर्माण होतो आणि कामात अडथळे येतात.


 


आर्थिक संकट
भरपूर पैसा कमावल्यानंतरही पैशाची बचत होत नाही आणि घरात आर्थिक संकट कायम असते. धनसंचय न होण्याचे कारण घराच्या नैऋत्य कोपऱ्यात वास्तु दोष आहे. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा किंवा खिडकी नैऋत्य दिशेला असल्याने दोष निर्माण होतात.


 


वादविवाद
वास्तू दोषामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे किंवा मतभेद देखील असू शकतात. घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला वास्तू दोषामुळे असे घडते.



सतत आजारपण
जर कुटुंबात लोक नेहमी आजारी असतील आणि सर्व पैसे औषध किंवा मद्यपानावर खर्च होत असतील तर घराच्या आग्नेय दिशेला वास्तुदोष असू शकतो.



ही आहेत वास्तू दोषांची कारणे


पूजेची खोली दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात असावी
घराच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यात मास्टर बेडरूम बनवणे
पती-पत्नीच्या पलंगाच्या समोर आरसा असणे
हँगिंग सीलिंग बीम
पाण्याची टाकी आणि गॅसची शेगडी किंवा स्टोव्ह एकाच ओळीत ठेवणे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Vastu Tips : जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल, तर घरात हे रोप लावा, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल!