Vastu Tips : नवीन घर बांधणे किंवा विकत घेणे हे एखाद्या व्यक्तीचे स्वप्न पूर्ण होण्यासारखे असते. कारण प्रत्येक व्यक्ती हे स्वप्न पाहतो. पण काही मोजकेच लोक असतात जे आपल्या मेहनतीच्या आणि उच्च हिमतीच्या जोरावर नवीन घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात. पण नवीन घर घेताना किंवा बांधताना, तुमच्या घराची रचना वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार आणि तत्त्वांनुसार केली गेली आहे हे खूप महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रामध्ये घराची दिशा, स्थिती, रंग, रचना, आकार इत्यादींचा उल्लेख केला आहे, या गोष्टी लक्षात ठेवल्याने घरात आणि कुटुंबात सकारात्मक उर्जेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे घर बांधताना किंवा खरेदी करताना प्रत्येक व्यक्तीने वास्तुशास्त्रातील महत्त्वाच्या आणि मूलभूत तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून तुमच्या स्वप्नातील घर कसे असावे? जाणून घ्या.


 


वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व


वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व मानले गेले आहे. यानुसार आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनावर नक्कीच काही ना काही प्रभाव पडतो. अनेक वेळा यश मिळवण्यासाठी केलेली मेहनत कामी येत नाही. वास्तुशास्त्रानुसार, काही वास्तु उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे झोपलेले भाग्य जागृत करू शकता. 



किचनसाठी वास्तु टिप्स


वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला बनवावे. स्वयंपाकघर कधीही नैऋत्य, ईशान्य किंवा उत्तरेकडे बांधू नये.


मुख्य दरवाजासाठी वास्तु टिप्स


घराचे प्रवेशद्वार सर्वात महत्वाचे मानले जाते. कारण याद्वारे नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जाही घरात प्रवेश करते. त्यामुळे प्रवेशद्वाराची दिशा योग्य असेल याची पूर्ण काळजी घ्या. वास्तूनुसार जर प्रवेशद्वार उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला असेल तर ते शुभ मानले जाते.


बेडरूमसाठी वास्तू टिप्स


बेडरूमची दिशा योग्य नसल्यास वैवाहिक जीवनात नेहमीच तणाव आणि कलह असतो. वास्तूनुसार बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला असावी.


मुख्य बाथरूमसाठी वास्तु टिप्स


जर घराचे स्नानगृह योग्य नसेल तर नकारात्मक उर्जेचा प्रवाह खूप वेगाने वाढतो. वास्तूनुसार स्नानगृह उत्तर-पश्चिम कोपर्यात बांधले पाहिजे आणि स्नानगृह उत्तरेकडे तोंड करावे.


लिव्हिंग रूमसाठी वास्तू टिप्स


दिवाणखाना म्हणजेच लिव्हिंग रुम पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला बांधता येतो. सकारात्मकतेसाठी, वास्तुनुसार शोपीस, झाडे, वनस्पती इत्यादींनी लिव्हिंग रूम सजवा.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


 


Vastu Shastra: घरात भरभराट होण्यासाठी 'या' 4 वस्तू कधीच ठेवू नका रिकाम्या; तरच होईल लक्ष्मीची कृपा