Vastu Shastra: जर तुमचे चांगले दिवस अचानक हळूहळू वाईट दिवसात बदलत असतील तर तुमच्या घरातील काही गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. अनेकदा घरात काही गोष्टी अशा असतात, ज्या रिकाम्या ठेवल्या तर त्याचे जीवनावर वाईट परिणाम होऊ लागतात. वास्तुशास्त्र (Vastu Tips) आणि शास्त्रीय मान्यतेनुसार, घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा लहानसहान गोष्टींमुळे माणसाचं नशीब पालटतं आणि हळूहळू गरिबीकडे वाटचाल होते. या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन समस्या येऊ लागतात. त्यामुळे कुटुंबाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी चार गोष्टी घरात कधीही रिकाम्या ठेवू नयेत.


धान्याचे डबे


वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये अन्नधान्य भरलेले डबे कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरा, जेणेकरून ते तुमच्या वाढीमध्ये अडथळा बनणार नाही. भरलेलं धान्याचं भांडार जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. तसेच दररोज देवी अन्नपूर्णेची दररोज पूजा करा, यामुळे घरातील भांडार कधीच रिकामं राहत नाही.


बाथरूममध्ये रिकामी बादली


वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. जरी तुम्ही बादली वापरत नसाल तरी ती नेहमी पाण्याने भरुन ठेवा. तसेच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. अंघोळीसाठी निळी बादली वापरा. बादली वापरल्यावर त्यात पाणी भरा आणि रिकामी ठेवू नका.


पूजेच्या खोलीत पाण्याचं भांडं रिकामं ठेवू नका


वास्तुशास्त्रानुसार, पूजा खोलीत ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर भांडे पाण्याने भरा आणि त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीची पानं टाका. देवालाही तहान लागते, अशी श्रद्धा आहे. पाण्याने भरलेले भांडे पूजेच्या खोलीत ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि देव तृप्त राहतो. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते. त्याच वेळी, रिकाम्या पाण्याच्या पात्राचा जीवनावर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.


तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका


तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी नसावी, हे नेहमी लक्षात ठेवा. तिजोरीत किंवा पर्समध्ये थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकामी तिजोरी किंवा पाकिट माणसाला गरिबीकडे नेतात, त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. ते एकाच वेळी पूर्णपणे रिकामे करू नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Numerology: शनीची 'या' जन्मतारखेच्या लोकांवर असते असीम कृपा; कर्माप्रमाणे मिळतं फळ, नांदते श्रीमंती