(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vastu Shashtra : खर्च थांबत नाही, पैसेही वाचत नाहीत, वेळीच 'या' चुकांकडे लक्ष द्या! वास्तुशास्त्रात म्हटंलय...
Vastu Shashtra : कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते. त्याचप्रमाणे वास्तु नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते
Vastu Shashtra : प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचे असते. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही कमावल्यानंतरही पैसे वाचवू शकत नसाल, तर याचे कारण जाणूनबुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात, ज्यामुळे लक्ष्मी देवी कोपते. कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या समस्येचे कारण बनते. त्याचप्रमाणे वास्तु नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरी खर्च उत्पन्नाच्या एक रुपयापेक्षा कमी राहतो. वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या...
पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्त्वाची
पैसे कमवण्याबरोबरच बचतही महत्त्वाची आहे. बचत केली नाही तर पैशाची कमतरता कायम राहते. पैशाची बचत न होण्यामागचे कारण म्हणजे पैशाशी संबंधित जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या चुका, ज्यामुळे देवी लक्ष्मी कोपते. संपत्तीचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे. त्यामुळे पैशाशी संबंधित छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. वास्तुशास्त्रामध्ये पैशांबाबत अनेक नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. तुम्ही वास्तू नियमांचे पालन न केल्यास, तुमची आर्थिक स्थिती खालवू शकते, म्हणजे पैसे मिळवले तरी आर्थिक चणचण कायम राहील. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्ज घ्यावे लागते. कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाहीत.
जर तुमच्यासोबतही असे घडले की, कमाई करूनही पैसे उरले नाहीत किंवा खर्च जास्त झाला तर त्याचे एक कारण वास्तुदोष असू शकते. त्यामुळे या चुकांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात. पर्स म्हणजे पैसे ठेवण्याची वस्तू. त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे.
पैसे मोजताना अनेकजण त्यावर थुंकी लावतात. असे केल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि भरपूर पैसा मिळवूनही पैशाची कमतरता राहते. त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्या.
ज्या घरांमध्ये लक्ष्मीचा वास असतो, त्या घरांमध्ये पैशाची कमतरता नसते. पण जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथेच माता लक्ष्मी राहतात. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला आशीर्वाद हवा असेल तर घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
आर्थिक संकटावर मात करण्याचे इतर उपायही वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. जसे घर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे, वास्तूनुसार वस्तू योग्य दिशेने ठेवणे, पूजा कक्षात शंख ठेवणे इ. या नियमांचे पालन केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसाही वाचवू शकाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: