Tulsi Vivah 2024 : हिंदू धर्मानुसार, दिवाळीनंतर (Diwali 2024) काही दिवसांनी तुळशी विवाह (Tulsi Vivah) करण्याची परंपरा आहे. त्यानुसार, दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो. मान्यतेनुसार, देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 5 महिने निद्रावस्थेतून जागे होतात. या दिवशी तुळशी विवाह केला जातो. त्यानुसार, यंदा 12 नोव्हेंबर 2024 रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. 


धार्मिक मान्यतेनुसार, तुळशी विवाह केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. आणि वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांचा विवाह लवकरच होण्याची शक्यता असते. त्यानुसार 2024 वर्षातला तुळशी विवाह कधी आणि तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त कोणता असणार आहे ते जाणून घेऊयात. 


तुळशी विवाह तारीख आणि शुभ मुहूर्त 2024


हिंदू धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला द्वादशी तिथीच्या प्रदोष काळात तुळशी विवाह साजरा केला जातो. वैदिक पंचांगानुसार, यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 04 वाजून 04 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 01 वाजून 01 मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे.  


प्रदोष काळ 


सूर्यास्तापासून 3 तासाछी कालावधी म्हणजेच साधारण 2 तास 24 मिनिटांचा प्रदोष काळ असणार आहे. या आधारे तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटं ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात तुळशीचा विवाह शाळिग्रामशी करावा. 


तुळशी विवाहाला सर्वार्थ सिद्धी योग 


यंदा तुळशी विवाह दोन शुभ मुहूर्तांमध्ये पार पडणार आहे. त्यानुसार, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे दोन शुभ योग जुळून आले आहेत. तुळशी विवाहाच्या दिवशी सकाळी 07 वाजून 52 मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होईल हा मुहूर्त 13 नोव्हेंबर रोजी पहाटे 05 वाजून 40 मिनिटांपर्यंत असणार आहे. तर, रवि योग सकाळी 06 वाजून 42 मिनिटं ते 07 वाजून 52 मिनिटांपर्यंत असणार आहे. 


तुळशी विवाहाचं महत्त्व


शास्त्रामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या शाळीग्राम रूपात तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशीविवाह केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. असे मानले जाते की जो कोणी तुळशी विवाहाचे आयोजन करतो त्याला अत्यंत शुभ फल प्राप्त होते. तुळशीविवाह पूर्ण विधीपूर्वक केला जातो. भगवान शाळीग्राम हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाते. असे मानले जाते की देउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराचा विवाह माता तुळशीशी झाला. म्हणूनच या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन केले पाहिजे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:       


Shani Gochar 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल, 2025 पर्यंत 'या' राशींचा सुरु होणार 'गोल्डन टाईम'; एकामागोमाग मिळतील शुभ संकेत