Surya Ketu Shukra Yuti : तब्बल 18 वर्षांनंतर कन्या राशीत सूर्य, शुक्र आणि केतू यांचा संयोग होत आहे. 18 सप्टेंबरला 3 ग्रहांची युती झाली आहे, ज्याच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना सोन्याचे दिवस येतील. सूर्याने (Sun) 18 सप्टेंबरला कन्या राशीत प्रवेश केला आहे, जिथे शुक्र (Venus) आणि केतू (Ketu) ग्रह आधीच उपस्थित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य, केतू आणि शुक्र यांचं एकाच राशीत येणं फारच दुर्मिळ आहे आणि हे 18 वर्षांनंतर होत आहे. तीन ग्रहांच्या युतीचा फायदा कोणत्या राशींना सर्वाधिक होणार आहे? जाणून घेऊया.


'या' राशींना येणार सुखाचे दिवस


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांना तीन ग्रहांच्या संयोगामुळे चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या सर्व चिंता दूर होतील आणि तुमची अनेक अपूर्ण कामं पूर्ण होऊ शकतात. तुम्ही उत्तम कल्पनांसह व्यवसाय हाताळण्यास सक्षम असाल आणि चांगला नफा देखील मिळवू शकाल. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता निर्माण होत आहे. ज्या विद्यार्थ्यांचं मन अभ्यासातून विचलित झालं होतं ते आता या काळात पुन्हा पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकतील.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीत होत असलेल्या 3 ग्रहांच्या युतीमुळे मेष राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शुभ परिणाम मिळतील आणि अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नोकरदार लोकांचे अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि त्यांची करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी किंवा नातेवाईकासोबत मतभेद किंवा वाद सुरू असतील तर या काळात ते मिटतील आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनही तुम्हाला आराम मिळेल.


वृश्चिक रास (Scorpio)


तुमच्या राशीमध्ये सूर्य, केतू आणि शुक्राची युती होत आहे, जी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला योग्य दिशेने वाटचाल करता येईल आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या समस्यांपासूनही आराम मिळेल. सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात तुमचा सन्मान वाढेल. पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. जर तुम्ही आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर या काळात तुमचं आरोग्य सुधारेल आणि अनेक कामंही पूर्ण होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम