Zodiac Signs : धकाधकीचं 2021 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली आणि कोरोना लशीच्या आशेखाली सरत आलं आहे. वर्षाचे काही दिवसं शिल्लक राहिले असून आता 2022 वर्षाच्या स्वागतासाठी आपण सज्ज झालो आहोत. तर येणारं वर्ष सर्वांनाच सुखाचं जावं अशी आशा प्रत्येकाचीच असते. दरम्यान येत्या वर्षात 7 राशींना त्याचं खरं प्रेम मिळणार आहे. प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ डॉ. आरती दहिया यांनी एका इंग्रंजी वेबसाईटशी बोलताना कोणत्या 7 राशींचं प्रेम जीवन फुलणार आहे, हे सांगितलं आहे. तर या सात राशी कोणत्या यावर एक नजर फिरवूया...
1. वृषभ
या राशीचे जे लोक अविवाहित आहेत, त्यांना 2022 मध्ये एखाद्या खास व्यक्तीशी संलग्न होण्याची आणि नवीन विश्वासू नातेसंबंध सुरू करण्याची शक्यता आहे. ते त्यांच्या जोडीदाराशी पूर्णपणे एक होऊन आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण घालवतील. त्यांचे नाते कासवाच्या गतीप्रमाणे संथ असले तरी प्रेमबंध प्रशंसनीय असतील.
2.कर्क
डॉ. आरती दहिया यांच्या मते, ज्यांचे राशीचे चिन्ह कर्क आहे, त्यांना 2022 मध्ये त्यांच्या जीवनसाथी नक्कीच भेटू शकतो. या राशीच्या व्यक्तीच्या प्रेमजीवनाची सुरुवात भावनिक होणार आहे. अगदी प्रेमळ संबध प्रस्थापित करुन एक वास्तविक नाते कर्क राशीच्या व्यक्ती यंदाच्या 2022 मध्ये उपभोगतील.
3.कन्या
प्रेम विश्वातील एक भाग्यशाली रास असणाऱ्या कन्या राशीच्या अविवाहित व्यक्तींना त्यांच्या आयुष्यातील प्रेम त्यांच्या जुन्या मित्रांद्वारे मिळू शकते. कन्या राशीचे व्यक्ती यंदा पहिल्या नजरेत प्रेमात पडण्याची अधिक शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींना कोणावर प्रेम असेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याची ही योग्य वेळ आहे.
4.वृश्चिक
वृश्चिक रास असणारे लोक कायम भावनिक असतात. अतिशय संवेदनशील असणाऱ्या या राशींच्या लोकांना एप्रिल 2022 च्या दरम्यान प्रेमजीवनात काहीतरी चांगलं घडण्याची दाट शक्यता आहे. एक स्थिर कनेक्शन त्यांच्या जीवनात येणार असून कुटुंबियांशी देखील ते आपल्या प्रिय व्यक्तीला भेटवू शकतात
5.धनु
धनु रास असणाऱ्यांसाठी 2022 हे वर्ष प्रेम जीवनाच्या दृष्टीने फार यशस्वी असणार आहे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत ते या काळात त्यांच्या जोडीदाराबद्दल अधिक उत्कट असतील. या काळात ते त्यांच्या आयुष्यातील प्रेमात देखील व्यस्त होऊ शकतात. जे लोक अविवाहित आहेत त्यांना 2022 च्या सुरुवातीपासून प्रिय व्यक्ती भेटण्यास सुरुवात होऊ शकते.
6.मीन
मीन राशीचे व्यक्ती जे आधीपासून रिलेशनमध्ये आहेत, त्याचं नातं आणखी बहरणार आहे. त्यांच्या बंधनात एक नवीन आकर्षण पाहायला मिळेल. ते त्यांच्या बंधनात आनंदाचे नवीन क्षण उपभोगतील. या कालावधीत त्यांच्या प्रेमबंधाची ताकद अधिक विकसित होईल आणि ते त्यांच्या नात्यात अढळ विश्वास निर्माण करतील.
7.मकर
मकर राशीचे लोक आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते जून, 2022 मध्ये त्यांच्या जोडीदारासोबत चांगलं आणि विश्वासाचं नातं निर्माण करतील. त्यांच्या संबंधातील जवळीक आणि उत्कटता ऑगस्ट महिन्यात शिखरावर असेल. 2022 च्या अखेरीस ते त्यांच्या आयुष्यातील प्रेमाशी लग्न करू शकतात. त्यांना जुलै महिन्यात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते परंतु सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व गोष्टी सुरळीत होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)
हे ही वाचा -
- Bigg Boss Marathi 3 : सिद्धार्थ जाधवने घेतली महेश मांजरेकरांची जागा, मांजरेकरांनी सोडला बिग बॉस मराठी कार्यक्रम?
- Ankita Lokhande-Vicky Jain Wedding : राजेशाही थाटात पार पडला अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा
- Brahmastra Motion Poster : 'लव्ह... लाइट... फायर...' ब्रह्मास्त्र चित्रपटाचा मोशन पोस्टर उद्या होणार रिलीज; अमिताभ बच्चन यांची खास पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha