एक्स्प्लोर

Taurus Yearly Horoscope 2024: वृषभ राशीसाठी 2024 वर्ष कसं राहील? व्यवसाय, नोकरीत यश मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Taurus Yearly Horoscope 2024: वर्ष 2024 आता सुरू होणार आहे. वृषभ राशीसाठी नवीन वर्ष कसं असेल? तुमचं करिअर, व्यवसाय, लव्ह लाईफ आणि महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्या.

Taurus Yearly Horoscope 2024: नवीन वर्ष 2024 लवकरच सुरू होणार आहे. वृषभ (Taurus) राशीच्या लोकांसाठी 2024 वर्षाची सुरुवात 2023 च्या तुलनेत थोडी तणावपूर्ण असू शकते. 2024 मध्ये तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. या वर्षी प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. 2024 हे वर्ष शिक्षण, करिअर, प्रेमसंबंध आणि आरोग्य इत्यादींच्या दृष्टिकोनातून कसं असेल? वृषभ राशीचं 2024 चं वार्षिक राशीभविष्य (Yearly Horoscope 2024 जाणून घेऊया. 

वृषभ करिअर राशीभविष्य 2024 (Taurus Career Horoscope 2024)

नोकरदार लोकांच्या जीवनात कायम कठोर परिश्रम राहतील. परिश्रम करूनच तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. तुमचं काम आणखी चांगल्यारितीने करणं हेच तुमचं ध्येय असलं पाहिजे. तुम्हाला फक्त मेहनत करत राहावी लागेल. तुम्ही तुमच्या कामाबद्दल खूप गंभीर असाल आणि मेहनतीने काम कराल. याचा फायदा असा होईल की तुम्हाला तुमचे वरिष्ठ अधिकारी देखील कामात मदत करतील, ते तुम्हाला आधार देतील. नोकरीच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधीही प्राप्त होऊ शकते.

वृषभ आर्थिक राशीभविष्य 2024 (Taurus Financial Horoscope 2024)

आर्थिक जीवनात तुम्हाला संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही या वर्षीपासून गुंतवणुकीचा विचार करू शकता. या वर्षी तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही, पण अनावश्यक खर्च टाळावा. या वेळी तुम्हाला काही अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. आवश्यक खर्चावरच खर्च केल्यास तुमच्याकडे पैशाचा ओघ सुरूच राहील. वृषभ राशीच्या लोकांना या वर्षी खूप मेहनत करावी लागेल, यामुळेच त्यांना यश मिळेल. शनिच्या कृपेने आणि आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांना यश मिळेल आणि भरपूर लाभही मिळतील. तु्म्हाला चांगला आर्थिक लाभ मिळाल्याने तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकाल.

वृषभ कौटुंबिक राशीभविष्य 2024 (Taurus Horoscope 2024)

या वर्षी तुमचे तुमच्या वडिलांशी चांगले संबंध असतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. या वर्षी केलेला कोणताही प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंध दृढ राहतील आणि ते तुम्हाला वेळोवेळी मदत करत राहतील. तुम्हाला नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान दूरच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याची संधी देखील मिळू शकते. यामुळे कुटुंबातही आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 

वृषभ प्रेम राशीभविष्य 2024 (Taurus Love Horoscope 2024)

वृषभ राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफमध्ये चढ-उतार असतील. थोडीशी तणावपूर्ण परिस्थिती तुम्हा दोघांनाही त्रास देऊ शकते. तुमचा जोडीदार काही गोष्टींवर तुमच्याविषयी गैरसमज मनात धरू शकतो, ज्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील. या वर्षी तुमच्या लग्नाची शक्यता आहे. तुमच्यात स्नेह वाढेल आणि तुम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकाल आणि नात्याचे महत्त्व समजून घेऊन तुम्ही तुमच्या प्रियकरावर मनापासून प्रेम कराल. 

वृषभ आरोग्य राशीभविष्य 2024 (Taurus Health Horoscope 2024)

आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगलं राहील. फक्त वर्षाच्या सुरुवातीला तुमचं आरोग्य कमकुवत राहील. वर्षाच्या मध्यात तब्येत हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. 

वृषभ राशी शुभ अंक 2024 (Taurus Lucky Number 2024)

वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये लकी नंबर 2 आणि 7 असतील. 

2024 मध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी खास उपाय (Upay For Taurus In 2024)

शनिवारी मुंग्यांना पीठ द्या आणि गरीबांना जेवण खाऊ घाला.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 2024 मध्ये शनि-केतूमुळे बनणार षडाष्टक योग; 'या' 4 राशींच्या लोकांचे नशीब चमकणार, मिळणार नोकरीच्या ऑफर्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget