Taurus Weekly Horoscope 6 to 12 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


वृषभ राशीचं करिअर (Taurus Career Horoscope)  


वृषभ राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा दुसरा आठवडा अनुकूल असणार आहे. तुमच्या नोकरी-व्यवसायात तुमची खूप प्रगती होणार आहे. तुमच्या व्यवसायाला तुम्ही एक नवी दिशा, नवीन ओळख द्याल. वेगळ्या उंचीवर तुमचं काम पुढे घेऊन जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल.या दरम्यान परिस्थिती तुमची साथ देईल. 


वृषभ राशीचे तरूण (Taurus Youth Horoscope)


तरूणांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा फार लाभदायक असणार आहे. तुम्ही आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. तुमचा मित्र-परिवार चांगला आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही कठीण प्रसंगी ते तुमच्या पाठीशी असतील. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याच्या अनेक संधी मिळतील. 


वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Money Wealth Horoscope)


या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. अनेक मोठ-मोठ्या संधी तुम्हाला मिळतील. जे व्यावसायिक आहेत त्यांना कामाच्या निमित्ताने परदेशी जावं लागू शकतं. त्यामुळे प्रवासाचा योग तर आहेच. हा प्रवास तुमच्यासाठी सुखकर असणार आहे. कामाच्या माध्यमातून दुसरं काम तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. 


वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)


या आठवड्यात तुमची तब्येत अगदी ठणठणीत असेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल. पण, जर काळजी घेतली नाही तर तुमची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे आरोग्य जपा. बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. जे वृद्ध आहेत त्यांना दिर्घकालीन आजार पुन्हा त्रास देऊ शकतो. त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ असेल. यासाठी वेळीट डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : सोन्याची अंगठी, पिवळा रूमाल, पेन आणि बरंच काही...जन्मतारखेनुसार 'ही' वस्तू तुमच्यासाठी लकी; स्वभावातील दोष कमी करण्यासाठी या वस्तू लाभदायी