Taurus Weekly Horoscope 13 to 19 May 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, मे महिन्यातला (May Month) तिसरा आठवडा आता सुरू होत आहे. हा नवीन आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे? करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फलदायी राहील. या आठवड्यात तुमची अनेक अपूर्ण कामं पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती दिसेल. वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणतंही नवीन काम करण्यापूर्वी त्याची नीट माहिती घ्यावी, तर आणखी अडचणी येणार नाहीत. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका आणि प्रगतीसाठी योग्य दिशेने प्रयत्न सुरू ठेवा.
वृषभ राशीचे आर्थिक जीवन (Taurus Wealth Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांवर या आठवड्यात लक्ष्मीची कृपा असेल, यामुळे त्यांना पैशाची कमतरता भासणार नाही. आर्थिकदृष्ट्या नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला असेल. या आठवड्यात कोणालाही पैसे उधार देऊ नका. या आठवड्यात तुमच्या कुटुंबात मालमत्तेचा वाद निर्माण होऊ शकतो. पैसे कमवण्याच्या आणखी मार्गांकडे लक्ष द्या.
वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योग करा. आपल्या आहाराकडे योग्य लक्ष द्या. पुरेशी विश्रांती आणि व्यायाम केल्याने तुमची ऊर्जा वाढू शकते, त्यामुळे योग्य त्या पर्यायांचा वापर करा. आरोग्य जास्त खालावलं किंवा एखादा किरकोळ आजार जरी उद्भवली तरी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)
या आठवड्यात तुमचे तुमच्या जोडादारासोबत काही खटके उडू शकतात, विशेषतः चुकीच्या संवादामुळे. तुम्ही जोडीदाराचं म्हणणं नीट ऐकून घेतलं आणि त्याच्या भावना समजून घेतल्या, तरच नातेसंबंध टिकून राहतील. सिंगल लोकांना या आठवड्यात कुणी खास व्यक्ती भेटेल, जिच्यासोबत हळूहळू नातेसंबंध प्रस्थापित होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: