Sharad Pawar on PM Modi : इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज आहेत? सत्तेतून बाहेर काढू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींकडे सांगण्यासारख काही नाही म्हणून ते टीका करतात, असेही ते म्हणाले. मी आणि उद्धव ठाकरे सुद्धा कदापि सोबत जाणार नाही, आम्ही तुम्हाला सत्तेतून बाहेर काढू, असा पलटवारही शरद पवार यांनी केला.


शरद पवार म्हणाले की, मोदींकडे सांगण्यासारख काही नाही म्हणून ते टीका करतात. त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी आणि नेहरूंचे विचार मजबूत करा असे सांगितले. तर यांनी आमच्या पक्षात या असे सांगितले.त्यांच्या पक्षाच्या आसपास सुद्धा मी आणि उद्धव ठाकरे कदापि जाणार नाही, उलट आम्ही त्यांना सत्तेतून बाहेर काढू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. 






सत्तेचा गैरवापर करणे ही त्यांची खासियत


सत्तेचा गैरवापर करणे ही त्यांची खासियत असल्याची टीका शरद पवार यांनी केली. ते म्हणाले की, लोकशाहीत दिलेलं मत त्यांना सहन होत नाही. अरविंद केजरीवाल यांची सुटका न्यायालयाने केली त्याचा मला आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरुंगात टाकले, पत्रकारांना तुरुंगात टाकायचं? गृहमंत्री यांना तुरुंगात टाकायचं? ही वाटचाल हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याची टीकाही त्यांनी केली. 


तर मोदी काय चीज? 


ते म्हणाले की, इंग्रजांना घालवण्यासाठी कोट्यवधी लोक एकत्र आले आणि त्यांना घालवले, तर मोदी काय चीज? असा हल्लाबोल त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी दौरा केला त्याचा अभिमान वाटला, तर मोदी त्यांना शहाजादे म्हणतात. त्यांच्या धोरणावर टीका करा, भाषणावर टीका करा, पण त्यांच्यावर वैयक्तिक टीका का करता? त्यांच्या वडिलांनी देशासाठी प्राण दिले, इंदिरा गांधींनी देशासाठी योगदान दिले., नेहरू जेलमध्ये राहिले त्यांच्यावर टीका करतात, असेही शरद पवार म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या